काय आसणार आहेत बदल..!!

लवकरच देवणी पोलीस स्थानकाचे सुशोभिकरण लॉनसह अनेक सुशोभीत वृक्षाची लागवड –सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री माणिकराव डोके

देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे

देवणी : पोलीस स्थानकात विविध कामासाठी येणाऱ्या सर्वसामान्य लोकांची परिसरात बसण्याची व्यवस्था व्हावी लॉन(हिरवळीच्या) माध्यमातून पोलीस स्थानक परिसरात
शोभेचे वृक्ष लागवड करून परिसर सुशोभीकरण करण्याचा संकल्प देवणी पोलीस स्थानकाचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री माणिकराव डोके यांनी केला आहे सुशोभीकरण कामाला सुरुवात केली असल्याचे लोकवैभव वार्तालाप करताना सांगितले
पोलीस निरीक्षक श्री डोके हे वृक्षमित्र आहेत वृक्ष लागवड कारणे त्याचे जतन कारणे त्यांचा छंद असून तो पोलीस स्थानक परिसरात कृतीत उतरविण्याचा प्रयत्न करीत आसाल्याचे दिसून येते काही दिवसात सुंदर अशी हिरवळ आपणास दिसून येईल सहाय्यक पोलीस निरीक्षक देवणी पोलीस स्थानक येथे रुजू झाल्यापासून तालुक्यात कधीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही अभ्यासू शांत सुस्वभावी व्यक्तिमत्व देवणी पोलीस स्थानकाला लाभले आहे किरकोळ वादविवाद पोलीस स्थानकात आले तर सदर आरोपी फिर्यादी यांना समोर बोलावून घेऊन दोघांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांना समाधान होईपर्यंत त्यांना समजून सांगून कागदावर न घेता वादविवाद मिटविण्याचा यांचा लोकहिताचा प्रकार आहे कारण आरोपी व फिर्यादी यांचा न्यायालयात वेळ काळ पैसा वाचत आहे त्यांच्यामुळे भाऊ बांधकीचे वाद ही संपुष्ठात आले आहेत अगदी कमी पोलीस कर्मचारी असताना कामाचे योग्य नियोजन करून कर्मचारी यांना मानसन्माने वागवून काम करून घेण्याची त्याची चांगली पद्दत आहे पोलीस निरीक्षक डोके हे पुणे मुंबई मेट्रो सिटी सारख्या मोठ्या पोलीस स्थानाकात उत्तम अशी कामगिरी बजावली आहे डोके हे मराठवाड्यातील सोलापूर येथील भूमिपुत्र आहेत आपल्या लोकांची सेवा करता यावी त्याची ऋण उताराई होता यावी म्हणून देवणी येथे रुजू झाले आहेत शासकीय नोकरी म्हण्टल् की बदली. बढती, व सेवानिवृती, या चक्रव्हिव्हा तून सर्वच कर्मचारी अधिकारी यांना जावे लागते आज इथे तर उद्या कुठे राहाल पत्ता राहत नाही त्यासाठीच आपली बदली झाली तरी आपली आठवण काहीतरी देवणी येथे सोडून जावे म्हणून पोलीस स्थानकाचे सुशोभीकरण करण्याचा माझा संकल्प आहे तो मी पूर्ण करणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री माणिकराव डोके यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp