देवणी महादेव मंदिर यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी बस्वराज बिराजदार तर सचिव पदी रेवण मळभगे
देवणी / प्रतिनिधी : येथील प्रति वर्षाप्रमाणे होणाऱ्या श्री ग्रामदैवत महादेव मंदिर यात्रा महोत्सव समिती २०२३ च्या अध्यक्षपदी बस्वराज बिराजदार तर सचिव पदी प्रा. रेवण मळभगे यांची एकमताने निवड करण्यात आली.
देवणी येथील महादेव मंदिर यात्रा महोत्सव निमित्त होणाऱ्या शिवपार्वती विवाह सोहळा
व अन्य धार्मिक कार्यक्रम करिता नुकतेच बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सी.एम. बिराजदार गुरुजी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून
माजी नगराध्यक्ष वैजनाथ अस्टुरे , बसवनप्पा लांडगे ,शिवराज बिराजदार, प्रभुराव पटणे, कांतराव अंबुलगे हे उपस्थित होते.
यात्रा महोत्सवा मधील सर्व कार्यक्रम चांगल्या रीतीने आनंदाने उत्साहाने पार पडावे याकरिता स्वतंत्र विभागानूसार कार्यकारणी करण्यात आली.
यात्रा महोत्सव सत्कार समिती करीता मल्लिकार्जुन डोंगरे , हावगीराव पाटील ,बसवराज पाटील ,बाबुराव लांडगे, रमेश मनसुरे यांची निवड करण्यात आली.
तर यात्रा महोत्सव समितीच्या उर्वरित कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष म्हणून उपनगराध्यक्ष अमित मानकरी ,नगरसेवक किशोर निडवंचे, अभिजीत सौंदाळे,
बसवराज बुदे ,मनोज पाटील, मयूर पटणे, सहसचिव पदी गुंडाप्पा कंटे, सोमनाथ कुडते, मनोज लांडगे, सुरज अंबुलगे, सुभाष टेंकाळे ,मनोज बुदे, कोषाध्यक्ष म्हणून काशिनाथ भद्रशेट्टे यात्रा कमिटी सदस्य म्हणून गणेश बोंद्रे ,धनराज जिवणे, विजयकुमार पाटील,
बंडेपा मुचळंबे, संजय मानकरी, निलेश लांडगे, वैजनाथ कारामुंगे, विद्यासागर धनुरे, प्रभूराव बिराजदार, अमित सौंदळे,हावगिराव पंचाक्षरे, बालाजी सूर्यवंशी, आकाश पाटील, रोहित पडसलगे ,आकाश संते ,शैलेश धनुरे ,राहुल बिराजदार ,महादेव लदे
आदींची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. रेवण मळभगे यांनी केले तर आभार मनोज पाटील यांनी मानले.

