देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीवर कोणाची वर्णी लागणार व इच्छुक चार
देवणी / प्रतिनिधी (लक्ष्मण रणदिवे) :




देवणी: आता नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अठरा पैकी सोळा उमेदवार निवडून आणून स्पष्ट बहुमत मिळविले आहे या निवडणुकीत सर्व जबाबदारी निलंगा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्वतः स्वीकारून स्वतःच्या व्यक्तिमत्वावर सर्व बळाचा वापर करून आपली प्रतिष्ठा पणाला लावून अठरा पैकी सोळा उमेदवार निवडून आणले आहेत उमेदवार नाममात्र मात्र आहेत दि 25 मे रोजी सभापती पदाची निवड आहे त्यामुळे मी सभापती पदाचा दावेदार आहे असं म्हणायचा अधिकार निवडून आलेल्या एकाही उमेदवाराला नाही निवड अवघ्या दोन दिवसांवर आली आहे भाजपाच्या गोठ्यातुन एकही नाव पुढे आले नसल्याने सर्वच निवडून आलेले उमेदवार संभ्रमात आहे वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत त्यात सदाशिव पाटील तळेगांवकर बसवराज पाटील देवणीकर, बालाजी बिरादार वलांडीकर राजकुमार बिरादार गौडगाव दिलीप मजगे ही नावे सद्या तरी चर्चेत आहेत कोणाची वर्णी लागणार हे मात्र गुलदस्त्यात आहेत सदाशिव पाटील यांना भगवान पाटील व शंकरराव पाटील यांचा भारतीय जनता पक्षाचा राजकीय वारसा आहे हे घराणे सद्या भाजपात सक्रिय आहे शंकर पाटील पंचायत समितीचे सभापती राहिले आहेत तर भगवान पाटील सद्या भाजपकडून लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तर उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अटीतटीच्या निवडणुकीत निवडणुन आहे आहेत भगवान पाटील तळेगांवकर आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे निकटवर्तीय असल्यामुळे सदाशिव पाटील यांची सभापती पदी वर्णी लागणार आहे अशी भारतीय जनता पक्षाच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे त दुसरे दावेदार बसवराज पाटील देवणीकर हे आहेत हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत जेष्ठ नेते आहेत प्रत्यक्षात लोकांतून निवडून येण्याची पहिली संधी त्याना मिळाली आहे हेही आमदार संभाजी पाटील यांच्या अतिशय जवळचे समजले जात असले तरी सर्वात जेष्ठ म्हणून सक्षम दावेदार ठरू शकतात असे असले तरी सर्व सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी सन्मानाची वागणूक देत नाहीत त्यामुळे कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर आहे तर तिसरे दावेदार बालाजी बिरादार वलांडीकर हे आहेत हे लोकाभिमुख लोकप्रतिनिधी आहेत यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे प्रशासक असतांना बालाजी बिरादार हे देवणी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून उत्तम अशी कारकीर्द बजावलीआहे तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या ओठांवरील नाव म्हणजे बालाजी बिरादार आहे चौथे दावेदार म्हणून राजकुमार बिरादार यांचे नाव पुढे येत असताना दिसत आहे गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी करता येईल पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत ही त्यांची जमेची बाजू आहेत पाचवे दावेदार दिलीप मजगे हे आहेत ते महसूल विभागातुन आत्ता सेवानिवृत्त आहेत त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला पहिल्यादा निवडून आले आहेत त्यांचा मनमिळाऊ स्वभाव व प्रशासकीय अनुभव यांच्या जोरावर आपले नशीब अजमावत आहेत कोणी काहीही म्हणो आले लोकप्रतिनिधीच्या मना तेथे कोणाचे चालेना याचं पद्धतीने निवड होणार आहे कोणाची वर्णी लागणार आता वेळ काळ ठरविलं सद्या परिस्थितीला सर्वच सभापती असल्याच्या अविर्भावात असल्याचे दिसून येत आहेत.