देवणी : येथे श्री ग्रामदैवत महादेव यात्रेनिमित्त जिल्हा परिषद लातूर, पंचायत समिती देवणी ,पशुवैद्यकीय कार्यालय देवणी, नगरपंचायत कार्यालय देवणी यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवारी (दि.4 ) घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय पशु प्रदर्शनास गोपालकाने मोठ्या प्रमाणात भरभरून प्रतिसाद दिला.
या जिल्हास्तरीय पशुप्रदर्शन पशु व पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव अभय साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले .तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन मानकरी हे होते. तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अरविंद भातांब्रे, अजित बेळकोने ,वैजनाथ अस्टूरे,वैजनाथ लुल्ले, कुशवार्ताताई बेळ्ळे ,देवणी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष डॉ. कीर्तीताई संजय घोरपडे,उपनगराध्यक्ष अमित मानकरी
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सदाशिवराव पाटील, उपसभापती दिलीप मजगे, यशवंत पाटील ,नगरसेविका तथा पाणीपुरवठा सभापती श्रीमती वंदनाताई राजकुमार बंडगर, बांधकाम सभापती सौ सत्यभामा खंडेराव घोलपे, स्वच्छता व आरोग्य सभापती प्रवीण बेळ्ळे,
डॉ. अनिल इंगोले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्रीधर शिंदे, सहाय्यक आयुक्त डॉ धोंड , देवणीचे तहसीलदार गजानन शिंदे, पोलीस निरीक्षक माणिकराव डोके, डॉ. केंद्रे, डॉ. इरफान सुभेदार, डॉक्टर आर एम व्ही प्रसाद, शेषरावजी मानकरी, जावेदभाई तांबोळी ,रमेश कोतवाल ,सोमनाथ लूल्ले, गोविंद बुरले, नामदेव वाघमोडे,सुभाष पाटील ,आनंद जीवने आदी उपस्थित होते.
या जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनामध्ये विविध निरीक्षक गटाच्या उद्घाटनानंतर देवणी बैल बाजाराची नियोजित आराखडाचे उद्घाटन करण्यात आले.
मान्यवरांच्या सत्कार नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीधर शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रेवण मळभगे यांनी केले तर आभार डॉ. अनिल इंगोले यांनी मानले.
हे पशु जिल्हास्तरीय पशुप्रदर्शन यशस्वी करण्याकरिता नगरसेवक नदीम मिर्झा योगेश ढगे डॉ. महादेव मळभगे, डॉ. संजय घोरपडे ,रोहित बंडगर, प्रशांत घोलपे, अमरदीप बोरे,इस्माईल शेख , राजकुमार जीवने,नगरपंचायत कर्मचारी, पशु वैद्यकीय कार्यालयातील डॉक्टर ,पर्यवेक्षक ,परिचर आदींनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp