
देवणी / प्रतिनिधी : येथील नगरपंचायत सभापतीपदाच्या निवडी बिनविरोध पार पडल्या.आज झालेल्या या निवडीत सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती पदी सौ. रेणुका रमेश कोतवाल यांची तर स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती पदी सौ शारदा अश्विन लांडगे यांची निवड करण्यात आली आहे.तसेच पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती पदी श्री नदीम सलीम मिया मिर्झा यांची तर महिला व बालकल्याण समिती सभापती पदी श्रीमती विमलताई विनायक बोरेयांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तसेच नियोजन व विकास समिती सभापती पदी उपाध्यक्ष अमित मानकरी यांची तर स्थायी समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध पणे नगराध्यक्ष सौ कीर्तीताई संजय घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीचे पिठासन अधिकारी म्हणून निलंगा येथील उपविभागीय अधिकारी शरद झाडके हे होते तर सहाय्यक म्हणून येथील मुख्याधिकारी संतोष लोमटे व तहसीलदार सोमनाथ वाडकर हे होते.या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा नगरपंचायत तर्फेसत्कार करण्यात आला.
