देवणी येथील शेतकऱ्याच्या मागणीला यश.
देवणी प्रतिनिधी-
देवणी येथे भारतीय स्टेट बँकेसाठी शाखा आदीकार्यासाठी निवेदन देण्यात आले होते.तरी भारतीय स्टेट बँक शाखा देवणी येथे दि.२५ जुलै रोजी शाखा अधिकारी रुजू होतील असे आश्वासन पत्र दिले व कृषी कार्यालयात आंदोलनाला यश सीएससी सेंटर शेतकऱ्याकडून घेतलेल्या शंभर दोनशे रुपये शेतकऱ्याला परत देण्यात येईल व सी एस सेंटर वर कारवाई करण्यात येईल असे निवेदन लेखी स्वरूपात देऊन शेतकऱ्याच्या मागणीला यश आले आहे.दिलेल्या निवेदनात आनंद जीवनेउर्फ पृथ्वीराज पाटील ,योगेश तगरखेडे, श्रीमंत लुल्ले, भगवान गुरुजी, बिरादार नंदू ,गिरी चेतन ,मिटकरी रमेश, सावरगाव रमेश, सूर्यवंशी दीपक, भाऊजी गडदे मामा, चंद्रकांत पाटील, शंकर जीवने ,शिवकुमार यडे ,व तसेच देवणी शहरातील व तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्याच्या मागणीला भरभरून यश कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ यांच्यावर कारवाई नाही केले व शेतकऱ्यांचे शंभर दोनशे रुपये परत नाही दिले तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असे आंदोलनाच्या वेळेस शेतकऱ्यांनी बोलले आहे