
देवणी : येथील श्री ग्रामदैवत महादेव मंदिर येथे संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या ४६३ व्या जयंतीनिमित्त दि. ८ फेब्रुवारी पासून अखंड शिवनाम सप्ताह व शिव पंचाक्षरी जप यज्ञ सोहळा संपन्न होणार आहे.
गुरुवारी (दि.८) मनीप्र सिद्धलिंग महास्वामीजी यांच्या सानिध्यात ध्वज पूजन ,कलश पूजन व विना पूजन होणार आहे. तर यानंतर ष.ब्र. सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज, आळंद यांची पाद्यपूजा यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या सप्ताहामध्ये दररोज पहाटे चार वाजता शिव पाठ सकाळी रुद्राभिषेक, परमरहस्य पारायण, मनीप्र सिद्धलिंग महास्वामीजी यांचे पाद्य पूजा व आशीर्वचन दुपारी प्रसाद गाथा भजन, मन्मथ चरित्र ,सायंकाळी शिव पाठ रात्री शिव कीर्तन, शिवजागर असे कार्यक्रम होणार आहेत.
तर या सप्ताहामध्ये प्रवचनकार व कीर्तनकार म्हणून स्वातीताई तंगशेट्टी ,कैलास महाराज जामकर, राजेश्वर स्वामी लाळीकर ,लक्ष्मण विभुते महाराज आलमला, नागेश स्वामी कुरुंदवाडीकर, आशाताई राऊत लातूरकर ,भूषण स्वामी वाखारीकर यांचे कीर्तन व प्रवचन होणार आहे.
बुधवारी (दि.१४) दुपारी बारा वाजता मन्मथ स्वामी जन्मोत्सव व ग्रंथ दिंडी महादेव मंदिर पासून निघणार आहे.
गुरुवारी (दि.१५) सकाळी दहा ते बारा विश्वनाथ स्वामी पेनुरकर यांचे महाप्रसादाचे कीर्तन होणार आहे.
या सप्ताह दरम्यान अरुणाबाई चनबस बेटकर ,आशाताई राजकुमार जीवने ,महादेवीताई शिवानंद जीवने ,शोभाबाई श्रीमंत लुल्ले ,सविताबाई रमेश घटबाळे, विभावरी बस्वराज पाटील, पूर्णबाई प्रभूप्पा येड्डे हे अन्नदाते राहणार आहेत.
या सप्ताह मध्ये गायक वादक म्हणून गुरप्पा लुल्ले , शिवाजी हळीखेडे ,रमेश मन्सूरे ,जनाबाई संगम रत्नमालाबाई स्वामी संग्राम बंडगर काशिनाथ मळभगे ,सचिन मंगनाळे ,सतीश आष्टूरे ,प्रभूराव इरकर, संदीप जळकोटे, शिवशंकर मळभगे ,दोडके महाराज, श्रीनिवास गुरुजी ,श्वेता मानकरी, हरिचंद्र हुडगे ,परमेश्वर हुडगे, शेषराव रुपनूरे, बसवराज हरनाळे ,शंकर बावगे, संजय म्हेत्रे, नामदेव इंगोले ,शिवाजी महानूरे ,श्रीरंग माने शिवाजी काकनाळे ,अभिषेक रोडगे हे राहणार आहेत.
तर गाथा व शिव पाठाचे प्रमुख म्हणून काशिनाथ धुळया स्वामी मळभगे हे राहणार आहेत .तरी या सर्व कार्यक्रमाचे भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री ग्रामदैवत महादेव मंदिर विश्वस्त समिती व समस्त गावकरी मंडळी यांच्याकडून करण्यात आले आहे.