
देवणी येथे जागतिक ग्राहक दिन साजरा
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी ,१५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने देवणी येथील तहसील कार्यालयामध्ये जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महसूल विभागाचे नायब तहसीलदार मा. श्री. एल पी कांबळे साहेब हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रास्त भाव दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष मा. अंकुश गायकवाड हे होते प्रा
स्ताविक करताना पुरवठा निरीक्षण अधिकारी मा. श्री शेखर सुरडकर साहेब यांनी या वर्षीच्या जागतिक ग्राहक दिनाची” A just transaction to sustainable lifestyle” ही (थीम) संकल्पना समजावून सांगितले तर अंकुश गायकवाड यांनी ग्राहकांना कसे फसवले जाते हे उदाहरणे देऊन समजावून सांगितले या कार्यक्रमासाठी व्यापारी तथा रास्त भाव दुकानदार संघटनेचे नेते राजकुमार साबणे. रामराव बिरादार. विनोद बिरादार. नागरगोजे मॅडम. पद्मसिंह गोटमुकले. मोहम्मद रफी मचकुरी. गणपतराव वाघमारे, पंडितराव कांबळे, गोपाळराव कारभारी, संगमेश्वर पत्री आदी उपस्थित होते