प्रस्ताव सादर केल्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा पाठपुरावाच नाही
देवणी : तालुका हा सीमावर्ती भागातील लातूर जिल्ह्यातील शेवटचा तालुका असून या तालुक्यातून तीस किलोमीटरचा नव्याने केलेला राज्यमार्ग गेला आहे.
या रस्त्यावर मोटरसायकल , चार चाकी वाहने तुफान वेगाने जात असल्याने अनेक अपघात होत आहेत.
या अपघातग्रस्त रुग्णांना तातडीची आरोग्य सेवा मिळण्याकरिता देवणी हुन 80 कि.मी. लातूर किंवा उदगीर जाण्याकरिता किमान 20 त किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.
यामुळे अधिक वेळ व आर्थिक खर्च वाढतो किंबहुना विलंब झाल्याने अपघात ग्रस्त रुग्णांचे जीव पण गमावावा लागतो.
याकरिता अपघातग्रस्त रुग्णांना विना विलंब तात्काळ सेवा मिळण्याकरिता देवणी येथे ट्रामा केअर सेंटर चालू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
तालुक्यातील देवणी शहरात ग्रामीण रुग्णालय तर मौजे बोरोळ वलांडी नागराळ या तीन ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रासह चौदा उपकेंद्र सध्या कार्यरत आहेत .
या सर्व ठिकाणांची रुग्णाची संख्या पाहता येथे ट्रामा केअर सेंटर होणे अत्यंत गरजेचे आहे. ट्राम केअर सेंटर नसल्याने अपघातग्रस्त रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत.
शिवाय सुविधा नसल्याने वरील सर्व आरोग्य केंद्रातून रुग्णांना जुजबी उपचार करून पुढे पाठविले जात आहे.
शिवाय तालुक्यात अपघाताचे पण प्रमाण वाढल्याने गंभीर अपघातातील अपघात ग्रस्त चे प्राण वेळप्रसंगी उपचाराअभावी जीव गमवावा लागत आहेत.
देवणी येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर सुरू झाले. तर सात आठ वैद्यकीय अधिकारी सर्जन फिजिशियन आर्थोपेडिक नीरो स्पेशलिस्ट महिला स्पेशलिस्ट आदी सह इतर कर्मचारी वर्ग उपलब्ध राहील.शिवाय अद्यावत मशनरी आल्याने रुग्णाची ताबडतोब सोय होईल.
येथे नव्याने ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यासाठी काही प्रमाणात इमारती उपलब्ध आहेत
.यासाठी शासनाला सदर सेंटर सुरू करण्यासाठी खर्च पण कमी येणार आहे .शिवाय सध्याची वाढती रोगराई, अपघातग्रस्त रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्यातील मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयात प्रमाणे सदर सेंटर त्वरित मंजूर करून सुरु करण्याची मागणी होत आहे.
चौकट:-
लोकप्रतिनिधी व प्रशासनाची उदासीनता
देवनी ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षकांनी दि.27 सप्टेंबर 2021 रोजी उपसंचालक आरोग्य सेवा लातूर यांना रीतसर देवणी येथे ट्रामा केअर युनिट मंजूर करण्याबाबत रीतसर प्रस्ताव सादर केला होता. पण यानंतर या प्रस्तावास कोणत्याच प्रकारे पाठपुरावा न केल्यामुळे अद्यापि हा ट्रामा केअर सेंटर प्रलंबित आणि प्रतीक्षेतच आहे.
ट्रामा केअर सेंटर चालू करण्याकरिता शहरातून राज्य किंवा राष्ट्रीय मार्ग गेलेला असावा लागतो. या तालुक्यात एक ग्रामीण रुग्णालय तीन प्राथमिक आरोग्य केंद्र, तर 14 उपकेंद्र आहेत. यामधून बाह्य रुग्ण संख्या,अंतर रुग्ण संख्या, प्रयोगशाळा चाचण्या ,लहान शस्त्रक्रिया, मोठ्या शस्त्रक्रिया ,प्रस्तुती संख्या या सर्व अटी पूर्णपणे होत असले तरीही हा प्रस्ताव प्रलंबित आहे.
या ट्रामा केअर सेंटर करिता इमारती करिता, यंत्र सामग्री करिता , रुग्णवाहिका करिता , तेल इंधन वंगण, औषध उपकरणे, साधनसामग्री कर्मचारी वेतन भत्ते , कार्यालयीन खर्चाचा आदींसह इतर अंदाजीत खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर ट्रामा केअर सेंटर चालू करण्याचे मागणी देवणी व परिसरातील नागरिकांनी केली आहे.