

देवणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन..
देवणी / प्रतिनिधी : श्रमिक हक्क आभियान कार्यालय देवणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलन करून सामुदायिक धम्म वंदना घेत पंचशील त्रिशरण ग्रहण करण्यात आले व सामुदायिक आभिवादन करण्यात आले.
या वेळी धम्म वंदना बालाजी टाळीकोटे यांनी घेतले व महपरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून शिव व्याख्याते सचिन मंगनाळे यांनी गित गायन केले.
या आभिवादन सभेला सामाजिक कार्यकर्ते नागनाथअण्णा गड्डीमे,माजी जि.प.सदस्य वसंत कांबळे,अग्रो इंडिया चे संपादक बालाजी टाळीकोटे, पत्रकार जाकिर बागवान,माजी नप सदस्य नामदेव कांबळे,नप कर्मचारी सय्यद सुजात, भारत मुक्ती मोर्चाचे तालुका अध्यक्ष मुजीब शेख,बहुजन मुक्ती पार्टीचे अध्यक्ष गुलाम शेख,शहराध्यक्ष अखिल सय्यद, पोहेका.उस्तुर्गे नरेश गणेश,बुजारे,वि.का.स.सदस्य पांडुरंग कदम, मुजाहेद मिर्झा, रहिम खुरेशी,शंकर पाचंगे,भिमराज गायकवाड, सुनील कांबळे,विद्यासागर शिंदे,आवेश सुर्यवंशी, महिला आघाडी आध्यक्ष आनिताताई सुर्यवंशी, बाबसाहेब सुर्यवंशी, प्रज्ञा सुर्यवंशी,ईश्वर मुर्के,सादक खुरेशी, आदी बहुजन बांधवांची उपस्थिती होती.
या आभिवादन सभेचे सुत्रसंचालन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ सुर्यवंशी यांनी केले तर आभार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ कांबळे यांनी मानले.