देवणी येथे दर्पण दिन साजरा
देवणी : येथील लासोणा चौकातील दैनिक पुण्यनगरीचे तालुका संपर्क कार्यालयात दर्पण दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन देवणी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अमित मानकरी यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर उपस्थित पत्रकार व मान्यवरांनी प्रतिमेस अभिवादन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हाॅईस ऑफ मिडीया संघटनेचे देवणी तालुकाध्यक्ष तथा दै.पुण्यनगरी तालुका प्रतिनिधी प्रा.रेवण मळभगे हे होते. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक आश्विन लांडगे, प्रा. दत्तात्रेय भंडे, मारुती टेकाळे,प्रसाद जोशी, कैलास कोरे, ज्येष्ठ पत्रकार महेश कणजे , बालाजी कवठाळे, नरेश बिरादार,हसन मोमीन,शकील मनियार, आनंद अंकुलगे, राहुल बालूरे, शादुल बौडीवाले,लक्ष्मण रणदिवे, प्रमोद लासोणे,सागीर मोमीन, कृष्णा पिंजरे , भैय्यासाहेब देवणीकर आदी सह पत्रकार व नागरिक उपस्थित होते.