


देवणी येथे प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या वतीने शिवदर्शन भवनचे भूमि शुद्धीकरण
देवणी : शहरातील मुख्य चौकातील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शाखा देवणी वतीने निर्माण होणाऱ्या शिवदर्शन भवनचे भूमी शुद्धीकरण सोहळा रविवारी (दि.८) संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गुरुलिंगेश्वर विरक्त मठाचे मठाधिपती मनिप्र सिद्धलिंग महास्वामीजी तर भूमी शुद्धीकरणचे उद्घाटक उदगीर येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा जेष्ठ उद्योजक मल्लिकार्जुन मानकरी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून देवणी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा डॉ. कीर्तीताई संजय घोरपडे, माजी प्राचार्य यशवंत पाटील, देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सदाशिवराव पाटील ,देवणी वकील संघाचे अध्यक्ष अँड .शिवानंद मळभगे ,ज्येष्ठ नेते हावगीराव पाटील, प्रजापिता ब्रह्मकुमारी उदगीर सेवा केंद्राचे संचालिका राजयोगिनी बी.के. महानंदा दीदी आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला.
यानंतर शिवदर्शन भवनचे भूमी शुद्धीकरण करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या सत्कारानंतर हे शिवदर्शन भवन लवकरात लवकर देवनीकरांच्या सेवेत उपलब्ध होणार असल्याचे प्रजापिता ब्रह्मकुमारी उदगीरचे उदगीर केंद्राचे संचालिका महानंदादीदी यांनी सांगितले. या भवन निर्माण करण्याकरिता सर्व मान्यवरांसह देवणीकरांनी सहकार करण्याचे भावना व्यक्त केले. हे शिवदर्शन भवन निर्माण झाल्यानंतर सर्व सदभक्तांकरिता निशुल्क उपलब्ध राहणार आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रजापिता ब्रह्मकुमारी अहमदपूरचे संचालिका बी.के. छायाबहेंजी यांनी केले तर आभार प्रदर्शन गट विस्तार अधिकारी अशोक कट्टेवार यांनी केले.
या कार्यक्रमास बी.के. सुलकक्षना बहनजी (जळकोट सेवा केंद्र संचालिका) बी.के. ज्योती बहनजी (चाकूर सेवा केंद्र संचालिका) बी.के.मीरा बहनजी बी.के.नंदा बहेनजी, लीलावती घटबाळे, निर्मलाबाई लुल्ले ,निर्मलाबाई कुडते ,काशीबाई ईश्वरशेट्टे, सरस्वती पाटील, प्रेमाबाई डोंगरे, रंजना डोंगरे, ललिता धनुरे ,करुणाबाई पाटील, शोभा नागूरे ,सुरेखा काळे, बसवन्नाप्पा लांडगे, शिवाजी डोंगरे,सोमनाथ लुल्ले , रमेश कोतवाल,चंद्रकांत स्वामी पत्री ,दयानंद स्वामी करकिले , प्रा.रेवण मळभगे,श्रीनाथ हुमनाबादे, ईश्वर मुर्के, रामलिंग लुल्ले, बसवराज ईश्वरशेट्टे आदींसह विद्यालयातील सदभक्त व शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो 👇👇