देवणी येथे बसवेश्वर जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

देवणी / प्रतिनिधी : येथील शिवयोगी श्री गुरुलिंगेश्वर विरक्त मठामध्ये बसवेश्वर जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले.
शनिवारी (दि.२२) सकाळी म.नि.प्र सिद्धलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते ध्वजारोहण तर महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ उद्योजक मल्लिकार्जुन मानकरी, सी.एम. बिराजदार गुरुजी, दिलीप पाटील नागराळकर, तहसीलदार सुरेश घोळवे, पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, आदींसह इतर बसव भक्तांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रतिमापूजन संपन्न झाले.
यावेळी उपनगराध्यक्ष अमित मानकरी, माणिकराव लांडगे, मल्लिकार्जुन डोंगरे, बस्वराज पाटील देवणीकर,
बाबुराव लांडगे, वैजनाथ अस्टुरे,वैजनाथ लुल्ले, हावगीराव पाटील, शेषराव मानकरी, यशवंत पाटील, विजयकुमार लुल्ले, नगरसेवक नागेश जीवने ,किशोर निडवंचे, प्रा. महादेव मळभगे ,योगेश ढगे, अमर पाटील ,कल्याण धनुरे, , डॉ.संजय घोरपडे, दिलीप मजगे, बाबुराव इंगोले, वसंत कांबळे, मनोहर पटणे, राजकुमार टिळे ,सचिन कल्याणकर, रमेश मंसूरे, व्यंकट चिद्रेवार ,रमेश कोतवाल, योगेश शिवगे ,शरण लुल्ले
,गणेश बोंद्रे ,सुभाष टेंकाळे, प्रीतम अष्टुरे ,राहुल बिराजदार ,रोहित बंडगर आदींसह बसव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी ११ वाजता श्री गणेश मंदिरापासून शहराच्या प्रमुख मार्गावरून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आले होती. या मोटरसायकल रॅली नगरसेवक नागेश जीवने किशोर निडवंचे यांनी झेंडा दाखवला.
यावेळी सुरज अंबुलगे ,प्रतिम अस्टुरे ,पटणे ,बालाजी सूर्यवंशी, शैलेश धनुरे, कैलास पडसलगे, ईश्वर पाटील ,सत्यवान डोंगरे, शशिकांत कप्ते ,मनोज बुदे ,स्वप्निल बावगे, अभिजीत सौंदाळे ,सागर हारकंचे मंगेश पत्री, सागर मसगले, अविनाश धनूरे, गणेश डेंगाळे, सिद्धेश्वर पाटील, अमित सौंदाळे, रमेश सावरगावे, दीपक मळभगे ,सचिन कल्याणकर, विशाल अंबुलगे ,आकाश पाटील, सुमित रोट्टे आदी मोठ्या संख्येने बसव भक्त मोटार सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
सायंकाळी ६ वाजता वीरशैव लिंगायत महिला भजनी मंडळी यांच्याकडून बसवेश्वरांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंगलाताई अष्टूरे, रत्नमाताई मानकरी, अर्चनाताई मानकरी, चंद्रमाबाई कप्ते ,पार्वतीबाई मंगलगे, कमलाबाई पाटील, प्रभावती मंठोळे, प-याग पाटील, शकुंतला मुर्के, उज्वला मंठोळे, लक्ष्मी अष्टूरे ,सुनीता पत्री, सरूबाई लांडगे, आदींसह महिला भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविवारी सकाळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन म.नि.प्र.सिद्धलिंग महास्वामीजी यांच्या
प्रमुख उपस्थितीत कल्याण माणिकराव धनूरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ६४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरिता डॉक्टर बी एम शेटकार, सचिन कोनाळे, हर्षद महाजन ,उमाकांत पांचाळ, विनायक टकटवळे ,बालाजी खडककोरे, बसवराज हरनाळे, शिवानंद पटणे, बस्वराज मंगलगे, आदित्य पाटील ,मनोज भद्रशेटे, विनोद येडे प्रदीप ढगे, कैलास बिराजदार, महादेव कोटे, आनंद पटणे ,बसवराज मळभगे, स्वरूप राजुरे, मयूर भद्रशेटे, अभिषेक करकेले, मनोज संते ,सचिन संते ,संदीप मंगलगे आदींसह बसव बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp