देवणी प्रतिनिधी

देवणी — मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम २१ जुलै ते २१ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येत आहे. याअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदार यादी पडताळणी करणार आहेत. नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती, नाव वगळणे, असा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या
अंमलबजावणीसाठी मंगळवारी येथील पंचायत समिती सभागृहात प्रशिक्षण पार पडले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे, तहसीलदार काशीनाथ पाटील, नायब तहसीलदार सुधीर बिराजदार, माधव साळुंखे, सुग्रीव बिरादार, राहुल कासले यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp