देवणी येथे शिवपार्वती विवाह सोहळा व कुस्त्यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
देवणी: देवणी येथील ग्रामदैवत श्री महादेव मंदिर येथे सोमवारी (दि.३) शिवपार्वती विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याकरिता बाहेर गावाहून चिगळी, करकेली, सताळा (ता. उदगीर) व शिरमाळी (ता. भालकी) येथून या चार व देवणी येथील मानाच्या मानकरी व बोंद्रे यांच्या कवड्यांचा लग्न विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
या विवाह सोहळ्यानिमित्त निमित्त येणाऱ्या शिवभक्तांकरिता अनेक देणगीदारांकडून प्रसाद व पिण्याच्या
पाण्याची सोय करण्यात आले होते. हे विवाह सोहळा संपन्न करण्याकरिता बंडेप्पा मुचळंबे, बसवराज मळभगे ,रमेश मन्सुरे , बस्वराज बुदे, प्रभुपा बिराजदार, काशिनाथ भद्रशेटे, अभिजीत सौंदाळे, मयूर पटणे, अमित सौंदाळे, ईश्वर पाटील बालाजी सूर्यवंशी,विनोद येड्डे,
निलेश लांडगे, मोहिनी संते, प्रिया चीलरगे, सुरज आंबुलगे, आनंद पटणे, विद्यासागर धनूरे, राजकुमार बुदे, राजकुमार बदनाळे,
शिवकुमार मळभगे , चंद्रकांत कोरे, भानुदास मोरे ,तेजस बोंद्रे,गिरीश कडगे, राहुल मंत्री, धीरज शिवगे, नागेश बावगे , मनोज बुदे , चेतन मिटकरी, आकाश पाटील आदींसह अनेक शिवभक्तांनी परिश्रम घेतले.
या यात्रेनिमित्त भव्य जंगी कुस्त्याचे नगर पंचायत देवणी यांच्याकडून आयोजित करण्यात
आले होते. या कुस्त्या समितीचे अध्यक्ष येथील ज्येष्ठ उद्योजक शेषरावजी मानकरी हे होते.
या कुस्त्यांच्या फडांमध्ये १ हजार रुपये पासून ते ११ हजार रुपये पर्यंतचे कुस्त्यांचे फड अनेक मल्लाने गाजविले. या कुस्त्या मध्ये शेवटची कुस्ती ही रूपये ११०००/- ची होती. ही कुस्ती प्रसाद शिंदे,उदगीर व ऋषिकेश बोबने, रायवाडी यांच्यामधील रंगत झाली व प्रसाद शिंदे हा विजेता ठरला.
या कुस्तीचे पंच म्हणून नगरसेवक प्रा. अनिल इंगोले, जाफर मोमीन ,रमेश बिरादार, हनीफ शिरमाळे ,शेंडगे मामा ,नागेश येड्डे,
ओम भंगे
आदींनी काम पाहिले .
तर हे कुस्त्यांचे कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उपनगराध्यक्ष अमित मानकरी, बाबुरावजी लांडगे , नगरसेवक महादेव मळभगे, नदीम मिर्झा, अमित सूर्यवंशी, किशोर निडवंंचे, इस्माईल शेख ,खंडेराव घोलपे, रशीद मल्लेवाले, देविदास पतंगे, दाऊद उंटवाले, नामदेव बंडगर, दामोदर नरवटे, शेषराव इंगोले,अमर पाटील, राजेश कोतवाल, सिद्धू पाटील, ओम धनुरे, नंदकुमार जीवणे आदींसह अनेक नागरिकांनी परिश्रम घेतले.

