देवणी येथे शेतकरी संघटनेच्या वतिने बोरोळ चौकात चक्का जाम आंदोलन

देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे

देवणी — शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष आनंद जीवने यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामध्ये सर्वच पक्षांनी शेतकरी संघटनेला पाठिंबा देऊन शेतकरी संघटनेच्या आंदोलना सोबत खांद्याला खांदा लावून सहभाग नोंदविला आंदोलन मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विविध पक्षांच्या मान्यवरांचे मनोगत व्यक्त करण्यात आले शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात आले त्या निवेदनात पिक कर्जाचा व्याज परतावा मिळावा, पिक विमा, अनुदान लागु करुन शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावे , दिवसा ८ तास लाईट मिळावे. अनधिकृत पणे पिक कर्ज वसुलीच्या नावा खाली पिक कर्जदाराचे बॅक खाते होल्ड केले आहे.त्याची चौकशी करून बँक अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी हे मागण्या मान्य नाही झाल्यास शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.या आंदोलनास अरविंद भातंबरे, सुरेंद्र आंबुलगे , मिथुन दिवे,गजानन ऊजळबे, विकास नमनगे, मेळकुंदे मामा,भंडे दत्ता अर्जुने व अमर मुर्के,अजित बेळकोने,सोमनाथ लूले, देविदास पतंगे, शरण लुले,अरुण पाटील,औदुंबर पांचाळ, माधवराव बिरादार, सादक खुरेशी,श्रीमंतांना लुले,योगेश तगरखेडे,चेतनजी मिटकरी, मल्लिकार्जुन ईश्वरशेटे,इब्राहिम तांबोळी,करीमभाई शेख,व तांबोळी परिवार खुरेशी चंद्रकांत माने पाटील पांडुरंग जी कदम साहेब कल्याण भाऊ धनुरे रमेश कोतवाल, प्रताप कोयले, लक्ष्मण रणदिवे, गिरधर गायकवाड,वैजनाथ साबणे, सिद्राम डोंगरे,बालाजी पाटील, कालिदास बंडे, किशोर पाटील, विळेगावकर संजयअंबुलगे,अजमभाई उंटवाले, असे अनेक शेतकरी देवणी शहर व तालुक्यातून या रास्ता रोको आंदोलनात उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp