देवणी येथे संत गुरु रविदास महाराज मुर्ती प्रतिष्ठापना महोत्सव संपन्न


देवणी / प्रतिनिधी : देवणी शहरात संत गुरु रविदास महाराज मुर्ती प्रतिष्ठापना महोत्सव 2023 अत्यंत हर्ष उल्हसात साजरा करण्यात आला. सुरुवातीस संत गुरु रविदास महाराज मुर्तीची भव्य शोभयात्रा काढण्यात आली. यावेळी काँग्रेस कमिटीचे प्रदेश सदस्य श्री.मल्लिकार्जुन मानकरी सावकार, उपनगराध्यक्ष अमित मानकरी, वैजनाथ लुल्ले, काँग्रेसचे शहराध्यक्ष जावेद तांबोळी, रशीद मल्लेवाले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. अखिल भारतीय रविदासिया धर्म संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संत 108 सुखदेवजी महाराज यांच्या शुभ हस्ते संत गुरु रविदास महाराज यांच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माधवराव गायकवाड यांनी भुषविले. यावेळी भारत नेपाळ मैत्री संघ सहप्रभारी नामदेव कदम, तहसीलदार सुरेश घोळवे, अमोल वाघमारे, प्रा. भगवानराव गायकवाड, सौ.ललिताताई वाघमारे, नगराध्यक्षा डॉ.सौ. किर्तीताई घोरपडे, अटल धनुरे, देविदास पतंगे, नगरसेवक अमित सूर्यवंशी, प्रा. महादेव मलभगे, दिपक मळभगे, व्यंकट बन, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, मधुकर वाघमारे, उर्मिला वाघमारे, शिवाजीराव लकवाले, धर्माजी उदबाळे, गोपाळ सुर्यवंशी, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, शिवाभाऊ कांबळे, माधव शेगावकर, प्रा.गणेश कांबळे मुरुमकर, चंद्रकांत मोठेराव, अखिल भारतीय रविदासिया धर्म संघटनाचे राज्य प्रवक्ता मोतीराम कांबळे वडगावकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. भगवान गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन रसिका महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सुधीर नाबदे यांनी केले. अमर टिळे, लक्ष्मण गायकवाड, सुभाष टिळे, सोनाजी टिळे, बालाजी टिळे, दयानंद कांबळे, राजकुमार लाडवते, धोंडिराम गायकवाड, शिवाजी टिळे, अमरनाथ देवनिकर, अंकुश टिळे , साईनाथ गायकवाड इत्यादी समाज बांधवांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp