उद्या लागणार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा निकाल..!!
मुखेड / विशेष प्रतिनिधी : तालुक्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध आसणारी सहकारी संस्था म्हणजे मुखेड कृषी उत्पन्न बाजार समिती होय..गेल्या आनेक दिवसापासून वाली नसलेल्या मार्केट कमिटी निवडणूक गेल्या महिनाभर प्रचारात गेली आसून हि निवडणूक पहिल्यांदाच एवढी आटीतटीची झाल्याचे पहावयास मिळते. आजी माजी आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली निवडणूक ही पुढील लोकसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे ट्रायल आसल्याचे जाणकारांचे म्हणने आहे.
खरं तर विद्यमान आमदार डॉ तुषार राठोड यांनी एकट्याच्या जिवावर मार्केटसाठी जिवाचे रान करून आनेक प्रस्थापित दिग्गज नेते एकीकडे झालेले आसताना आपल्या सुयोग्य नियोजनात निवडणूकीत आज ही तालुक्यावर कमांड आसल्याचे दाखवून दिले. त्याच बरोबर माजी आमदार हाणमंतराव पाटील व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर बंधू जून्या-नवख्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना घेऊन निवडणुकीत रणधुमाळी केली त्यांचा प्रत्यक्ष रोख म्हणजे मह्त्वाचे नेते हाताशी धरून सिताफिने वातावरण व राजकारण यशस्वी करण्याचा डाव साधत आहेत.
दिवसभर उन्हात रांगेत उभे राहून मताचा आधिकार बजावण्यात मतदान कुठेही कमी पणा केले नाहीत. उमेदवारांपेक्षा मतदारच मतदानाची काळजीने मतदान केल्याचे चित्र पहावयास मिळाले .एकंदर कुठेही ताण-तणाव निर्माण न होता सदर निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार जरी पडली आसली तरी..सर्वच्या सर्व उमेदवारांच्या चेहऱ्यावर गांभीर्य दिसत होते.याचा अर्थ प्रत्येकाच्या मनात धाकधूक दिसत होती. मतदान शेवटच्या क्षणापर्यंत होत राहिले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठेही अनूचीत प्रकार घडला नाही.
आसे झाले मतदान..
कृषी उत्पन्न बाजार समिती मुखेड
एकूण मतदान 3945
झालेले मतदान 3729 एकूण मत.टक्केवारी 94.52 %
सेवा.सोसा.मतदार संघ.
एकूण मतदान
1204
झालेले मतदान
1186
98.50%
ग्राम पं.मतदार संघ.
एकूण मतदान
1136
झालेले मतदान
1116
98.23%
व्यापारी मतदार संघ.
एकूण मतदान
939
झालेले मतदान
862
91.79%
हमाल मापारी मतदार सं.
एकूण मतदान
669
झालेले मतदान
565
84.45%
उद्या सकाळी निवडणूक निकाल लागणार आसल्याने उमेदवारांना मनामध्ये धाकधूक होतांना धडकी भरली आसून निकाल लागे पर्यंत उमेदवारांचा व पुढा-यांचा जिव मात्र टांगणीला लागल्याचे चित्र मतदारसंघात दिसून येत आहे. कोणाला लागेल गुलाल कोणाचा होईल पराजय हे मात्र उद्याचा निकालच ठरवेल..!!