
धाराशिव च्या शेतकरी पुत्राने लिहिले महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना ऑनलाईन पत्र.
धाराशिव जिल्ह्यातील सोनेगाव ता. जि.धाराशिव (उस्मानाबाद) येथील शेतकरी पुत्र व जाणीव अस्मितेची साहित्य परिषद उस्मानाबाद चे जिल्हाध्यक्ष असणारे ,सामाजिक कार्यकर्ते लेखक कवी श्री विकास कांबळे यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री श्री.धनंजय मुंडे यांना सोशल मीडिया / ईमेल द्वारे ऑनलाईन पत्र लिहून शेतकरी हिताची मागणी केली आहे. त्यांनी पत्रांमधून 21 वर्षा पुढील शेतकऱ्यांना महिना दहा हजार मानधन सुरू करण्याची मागणी केली आहे. शेतकरी हा शेती खर्चाने ग्रास ल्यामुळे तसेच त्याला निसर्गाच्या अस्मानी व सुलतानी संकटाचा वेळोवेळी सामना करावा लागतो.त्यामुळे कृषी शासनाने त्याला महिना दहा हजार मानधन सुरू करावे. त्याची शेती सेवा ही विचारा धी न ठेवून प्राधान्याने ठेवून त्याला शासकीय दर्जा देऊन “शासकीय शेतकरी” नावाचे ओळखपत्र द्यावे . अशी मागणी त्यांनी कृषी मंत्री यांना ऑनलाईन पत्रातून मांडली आहे.
कृषी मंत्री यांना लिहिलेले पत्र.
प्रति,
आदरणीय कृषिमंत्री
मा. धनंजय मुंडे
साहेब .
(कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्य)
मंत्रालय, मुंबई.400020

आदरणीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब,
सस्नेह जय महाराष्ट्र …!!
पत्र लिहिण्यास कारण की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा हे आपण ही जाणताच.
परंतु आजवर त्याला हे भूषण लेबल केवळ बोलण्या पुरते राहिले आहे.त्याची आर्थिक परिस्थिती खालावली की त्याच्या मदतीला कोणीही येत नाही. त्याच्या शेती मालाचे भाव पडले की कोणीही त्याच्या मदतीला धावून येत नाही .शेवटी शेती कसण्यासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज फेडता येत नाही म्हणून कर्जबाजारी पणाला कंटाळून तो आत्महत्या करतो. या आत्महत्या टाळण्यासाठी त्याला तटपुंजे बळ मिळावे म्हणून आपण त्याचे दुःख मिटवता यावे म्हणून मी केलेल्या पुढील मागणीचा विचार आपण करावा ही विनंती. उभ्या जगाला पोसणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातील बळीराजाला महिना 10 हजार मानधन चालू करावे. शासकीय शेतकरी असा त्याला दर्जा देऊन त्याला शासकीय दर्जा शासकीय शेतकरी या नावाचे विशिष्ट शासकीय ओळखपत्र द्यावे.
शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी आपण हे पाऊल उचलावे.
एक शेतकरी पुत्र म्हणून आपण माझ्या या बळीराजा हिता साठी पत्रातून आपणास केलेल्या मागणीचा विचार कराल अशी तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यां तर्फे मी आपणा कडून आशा व विनंती व्यक्त करतो.
!!…जय जवान जय किसान..!!
कळावे,
शेतकरी पुत्र
( विकास कांबळे)
प्रेषक: विकास बापू कांबळे
मु.पो.सोनेगाव तालुका जिल्हा धाराशिव( उस्मानाबाद)
Pin- 413501
ईमेल: vikasdocument228@gmail.com
संपर्क: 9527650064