देवणी / प्रतिनिधी : नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारी अर्ज भरण्याची गुरुवार दि.३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती.
या कालावधीमध्ये देवणी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाकरिता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सौ कीर्ती संजय घोरपडे यांचा एकमेव अर्ज असल्याने आता नगराध्यक्षपदाचे आता फक्त घोषणा करण्याचे अनौपचारिकता शिल्लक राहिली आहे.
देवनी नगरपंचायतीच्या एकूण १७ उमेदवारांपैकी काँग्रेस पक्षाचे १२ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २भाजपा १ अपक्ष १व महाराष्ट्र विकास आघाडी १ असे पक्षीय बलाबल होते.
काँग्रेस पक्षाचे एकूण १२उमेदवार विजयी झाल्यामुळे नगरपंचायतीच्या वर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. तर नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून सौ कीर्ती संजय घोरपडे यांच्या नावाची उमेदवारी दाखल केल्याने आता ते नूतन नगराध्यक्ष म्हणून दि. ९ फेब्रुवारी रोजी घोषणा होणे औपचारिकता शिल्लक राहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp