नवदुर्गा सेवाभावी संस्थेच्या वतीने हळदी – कुंकू व नेत्रतपासनी शिबिराचे आयोजन
——————————————-

उदगीर / प्रतिनिधी : नवदुर्गा सेवाभावी संस्था उदगीरच्या वतीने हळदी- कुंकूवाचा व आरोग्य आणि नेत्रतपासनी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २२ जानेवारी रोजी भोई गल्ली उदगीर येथील दुर्गामाता मंदिरात दुपारी दोन ते पाच या वेळेत संपन्न होणाऱ्या या हळदी कुंकूवाच्या व आरोग्य, नेत्र तपासणी शिबिराचा उदगीर व परिसरातील महिला व पुरूषांनी लाभ घ्यावा असे आवाहन नवदुर्गा सेवाभावी संस्था उदगीरच्या अध्यक्षा मीरा अनंतवाळ,सचिव सुनीता अनंतवाळ, उपाध्यक्ष रंजना हिवरे ,सदस्या ममता अनंतवाळ, अरुणा हिवरे, शीला रंगवाळ, वैशाली रंगवाळ, सपना उकंडे, चंचल रंगवाळ, सुरेखा अनंतवाळ,संगीता अनंतवाळ, संगीता फुरमाळकर, निर्मला हिवरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp