नविनवर्षाच्या सुरूवातीस मास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.राजाभाई सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त देवणी पोलिस ठाण्यात वृक्षरोपण संपन्न.

देवणी प्रतिनिधी; रणदिवे लक्ष्मण
देवणी तालूक्यातील मास संघटनेच्या वतीने वाढदिवसानिमित्त मातंग अस्मिता संघर्ष सेना (मास )संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बहुजननायक मा.श्री. राजाभाई सूर्यवंशी (भाई ) यांचा वाढदिवस मास संघटना देवणी तालुक्याच्या वतीने देवणी पोलीस ठानेच्या प्रांगणात वृक्षरोपण करून साजरा करण्यात आला, खऱ्या अर्थाने राजाभाई सूर्यवंशी नाव ऐकू येताच किंवा डोळ्याला दिसताच अन्याय,अत्त्याचार,भ्रष्टाचार, तसेच जातीवाद यांना घाम सुटतो असे व्यक्तिमत्व, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात राजाभाईंचे कार्य सातत्याने निःस्वार्थ निष्कलंकपणे चालू आहे, अश्या महान व्यक्तिमत्वाचा आज १ जानेवारी दिवशी जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात न्हवे तर संपूर्ण देशात साजरा केला जात आहे, मातंग अस्मिता संघर्ष सेना (मास )संघटना देवणी तालुक्याच्या वतीने देवणी पोलीस ठानेच्या प्रांगणात वृक्षरोपण करून मोठ्या आनंदाने उल्हासने साजरा करण्यात आला, यावेळी देवणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा.श्री.बी.आर.बंडे साहेब,पो.हे.कॉ. मा.श्री. विनायकरावजी कांबळे साहेब, ठाणे अंमलदार श्री. धनराज शिवगुंडे , बुजारे , सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. शिवाभाऊ कांबळे,मास संघटना देवणी तालुका अध्यक्ष तथा पत्रकार श्री. जितेशभाऊ रणदिवे (विळेगावकर ), गजाननभाऊ गायकवाड आजनिकर, देविदास सूर्यवंशी, मास भाऊ,पत्रकार लक्ष्मण रणदिवे, अजय कांबळे, शिवा कांबळे देवर्जन, सुनिलभाऊ लांडगे, श्रीहरीभाऊ सूर्यवंशी,रोहित सूर्यवंशी, अनंत सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp