नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाचा तहसीलदारांना निवेदन देऊन जाहीर निषेध.

देवणी प्रतिनिधी—
नांदेड, आणि छत्रपती संभाजी नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णांलयांमध्ये दाखल रुग्णांना नीट उपचार न मिळाल्याने रुग्णाची मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे यामुळे उपेक्षीत लोककलावंत मजूर व निर्धाराची पुरूनर्वसन संघटनेच्या वतीने देवणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की महाराष्ट्रातील नामवंत जिल्हा नांदेड येथील शासकिय जिल्हा रुग्णालय व छत्रपती संभाजीनगर शासकिय रुग्णालय येथे उपचारादरम्यान लहान बालके व प्रौढ रुग्ण ज्यामध्ये हृदयविकार, विषबाधा, श्वानद्वंशावरील उपचार घेत असलेल्या रुग्णांचा योग्य त्या उपचारा अभावी व दरम्यान काळात रूग्णालयात औषधाचा तुटवडा व अपुरे कर्मचारी असल्यामुळे संबंधित रुग्णांना आपला जिव गमवावा लागलेला आहे. तरी संबंधित अधिकारी आणि प्रशासन यांच्यावर सदोष मनुषवधाचा
गुन्हा दाखल करून रुग्णांच्या नातेवाईकांना न्याय मिळवून दयावा व मृत रूग्णांच्या नातेवाईकांना शासकिय मदत जाहिर करावी. या संबंधित राज्य शासनाचा गल्थन कारभाचा या संघटनेच्या वतीने देवणी तहसीलदारांना निवेदन देऊन जाहिर निषेध करण्यात आलं.यावेळी निवेदनात जिल्हा अध्यक्ष लातूर अभंग सूर्यवंशी,महिला लातूर जिल्हा अध्यक्ष अनिता सूर्यवंशी,देवणी तालुका अध्यक्ष महेरूनबी शेख,
लातूर जिल्हा महासचिव गोकुळजी दंतराव,देवणी तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटोळे,देवणी तालुका उपाध्यक्ष
धनाजी आपटे,देवणी शहर उपाध्यक्ष उर्मिलाबाई कांबळे,देवणी शहर अध्यक्ष लक्ष्मीबाई सुर्यवंशी,लातूर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख लक्ष्मण रणदिवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp