खंत ऐका जेष्ठ पत्रकाराची..!!

नांदेड : नांदेडचे भ्रष्ट जिल्हा प्रशासन,सांस्कृतिक ठेकेदार नांदेडात गोदावरी घाटावर दिवाळी पहाट हा कार्यक्रम नांदेड जिल्हा प्रशासन, गुरूव्दारा बोर्ड नांदेड मनपाच्यावतीने २०१७ वर्षापासून घेण्यात येत आहे.यासाठी तथाकथित सांस्कृतिक ठेकदारांनी भागविण्याच्या उद्देशाने चांडाळ चौकडीने जिल्हा प्रशासनाने आग्रह धरला.यासाठी जिल्हा प्रशासनाची गुप्त बैठक घेतली.यासाठी प्रशासनाने आर्थिक सहकार्य करावे,असे ठरले.त्यासाठी शहारातील बड्या कंत्राटदारांकडून दिवाळी पहाट या कार्यक्रमासाठी गैरकायदेशीर, नियमबाह्य पध्दतीने लाखो रूपसे वसूल केले.याबाबतची मला माहिती कळाली, तेंव्हा मी जिल्हा प्रशासनाकडे या कार्यक्रमाची आयोजन व खर्चाची माहिती मागितली.पण प्रशासनाने माहिती तर दिलीच नाही. उलट माझ्यावर दबाब आणण्यासाठी संयोजक अधिकारी घरी पाठविला गेला.त्यावेळी त्या दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या संयोजक अधिकार्‍यांने मला आमिष दाखविण्याचा प्रयत्न!आपणाला मदत करू! आपला तेथे सत्कार करू, असे सांगितले.मी त्यास नकार दिला.मी मला काहीही नको,केवळ मला माहिती पाहिजे,असे स्पष्टपणे सांगितले.त्यावेळी अधिकार्‍यांनी दिवाळी कार्यक्रमासाठी ज्या कंत्राटदारांनी पैसे दिले! त्याची यादी केवळ दाखविली.त्यानंतर त्यांनी लेखी माहिती देऊ असे आश्वासन दिले.मी विश्वास ठेवला.पण नंतर जिल्हा प्रशासनाने याबाबत माहिती देण्यास टाळटाळ सुरु केली, इतकेच नव्हे सांस्कृतिक चांडाळ चौकडीच्या माध्यमातून मी दिवाळी पहाट कार्यक्रमालाच विरोध करत आहेत,असा अप्रचार सुरु केला.वास्तविक प्रथम मी दिवाळी पहाट कार्यक्रमाला विरोध नाही आधीच स्पष्ट केले होते.केवळ नांदेड जिल्हा प्रशासनाच्या कार्यपध्दीवर आक्षेप घेतला होता!माझा नांदेड जिल्हा प्रशासन सांस्कृतिक ठेकेदारांचे ऐकून भ्रष्ट कंत्राटदार पैसे घेवून कार्यक्रम घेण्याचा कार्य पध्दतीला विरोध आहे.वास्तविक नेहमी भ्रष्टाचाराच्या विरोधात,नैतिकतेचा गप्पा मारणारे सांस्कृतिक ठेकेदार मूग गिळून का गप्प आहेत ? या सांस्कतिक ठेकेदारामुळे प्रशासन अडचणीत सापडले आहे.मया भ्रष्टपध्दतीच्या विरोध म्हणून मी २०१९ मध्ये माहितीचा अधिकारात अर्ज दिला, तो घेण्यास विरोध झाला.मी तेथेच धरणे धरले!तेंव्हा अर्ज स्वीकारला गेला.त्यानंतर माहिती अधिकारात दिलेल्या माहितीवर तारीख वेगळी! पण टपाल जाणीवपूर्वक पोस्टात उशीरा टाकला गेली.प्रशासनाचा कारभार पारदर्शक असेल तर मग ज्या संयुक्त बैठका घेतल्या गेल्या,नियोजन केले गेले!तसेच नियमानुसार निधी दिला असेल तर माहिती देण्याचे का टाळले जात आहे? अपीलात माहिती दिली गेली नाही. माझेकाय म्हणणे याची नोंद न करता, अर्ज फेटाळला गेला,आता राज्य माहिती आयुक्याकडे अर्ज आहे,मी चार वर्षापासून पाठपुरावा करत आहे.त्यानंतर करोनाचे संकट माझ्या डोळ्यांना झालेला आजार,शस्त्रक्रिया पाच वर्षे गेले. तरी मी एकटा जिल्हा प्रशासनाने भ्रष्ट कार्यपध्दीच्या विरोधात पाठपुरावा करत आहे.मी वैयक्तीक कोण्याच्या विरोधात नाही.तरी २०२१ दिवाळी पहाट कार्यक्रम घेतला गेला.यावेळी पुन्हा जिल्हा प्रशासनाचा उल्लेख केला गेला.यामुळे जिल्हा माहिती १८-१-२२ माहितीसाठी अर्ज दिला होता.तो अर्ज स्पीड पोस्टने दि.१९-१- २२ रोजी दुपारी मिळाला तरी तो २२-१-२२ रोजी मिळाल्याचे माहितीत दाखविण्यात आले, माहिती देण्याचा पत्रावर १६-२-२२ रोजी नमुद करण्यात आली आहे! पण हे टपाल २६-३-२२ रोजी प्राप्त झाले आहे.याचा अर्थ टपाल उशीरा पाठविले गेले,हे स्षष्ट आहे.तसेच २०२१ अर्ज माहिती २०१९ पत्राची दिली गेली,तसेच नांदेड जिल्हाधिकारी संकेतस्थळावर या कार्यक्रमाची आयोजित करण्यात आली नाही! असे म्हंटले आहे.मग कार्यक्रमात जाहिरातीत जिल्हा प्रशासनाचा उल्लेख कसा? हा छूपा अजेंठा आहे काय? तसेच यासाठी कोणतेही अनुदान नाही,असे म्हंटले आहे. मग प्रशासनाची लुडबूड का? हा कार्यक्रम घेणारे कोण? त्यासाठी पैसा कोण देतोय? तो नियमानुसार घेतला जातो,आहे. याची जिल्हा प्रशासनाने खात्री न करता! सहभाग कसा? याचे आश्चर्य वाटते.माझा तक्रारी अर्ज असताना जिल्हा प्रशासन या कार्यक्रम आयोजकाकडून माहिती घेवू शकते.पण पध्दतीरपणे या कार्यक्रमाची माहिती अधिकार्‍यांनी देण्याचे टाळले आहे! अशी आहे, भ्रष्टाचार लपविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची चालखी! ! मी डोळ्यांचा आजाराने त्रस्त आहे.खर तर! प्रशासन भ्रष्ट पध्दतीने काम करत असेल तर त्याला विरोध करणे जागृत नांदेडकरांचे जबाबदारी आहे, दुर्देवाने या कोणीही जबाबदार व्यक्ती पुढे येत नाही,तसेच पत्रकार याबाबत लेखणी झिजवत नाहीत. माझ्या सारख्या ज्येष्ठ पत्रकार, नागरिकाला जिल्हा प्रशासन माहिती देण्याचे टाळटाळ करत आहे! तर सामान्य माणसाला प्रशासनानकडून न्याय मिळेल काय?
– कमलाकर जोशी!ज्येष्ठ पत्रकार

नांदेड,दि.२९-२-२२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp