- नांदेड येथे ॲट्रॉसिटी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न.*
पुणे — दिनांक ७ जुलै प्रतिनिधी
बार्टी संस्थेचे महासंचालक मा.सुनिल वारे , यांच्या निर्देशानुसार आणि बार्टीच्या निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार, विभागप्रमुख मा अनिल कांरडे यांच्या नियोजनाखाली अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 व सुधारित अधिनियम, 2016 ची प्रभावी अंमलबजावणी तसेच कायद्याचा प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी नांदेड जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा दि. 07 जुलै 2023, वार शुक्रवार, वेळ सकाळी 10:00 ते सायं. 05:00 दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जि. नांदेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी), पुणे व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाली.
कार्यशाळेचे अध्यक्ष मा.श्री. पी. एस. बोरगांवकर (अप्पर जिल्हाधिकारी जि. नांदेड) होते. प्रमुख उपस्थिती : मा. श्री. योगेश कुमार (पोलिस अधिक्षक, नागरी हक्क संरक्षण,परीक्षेत्र नांदेड), मा. श्री. अविनाश कुमार, अति. पोलिस अधिक्षक जि. नांदेड, मा. जिल्हा शासकिय अभियोक्ता श्री. देशमुख, तज्ञ व्याख्याते श्री. सुभाष केकाण यशदा बार्टी, अॕड गजानन पिंपरखेडे, नांदेड, श्री. बी. एस. दासरी , सहा. आयुक्त, जि. नांदेड, श्री. सत्येंद्र आउलवार, समाज कल्याण अधिकारी, जि. नांदेड, श्री. शरद मंडलिक (SDM कंधार) श्री. चंद्रसेन देशमुख (SDPO कंधार), श्री. सुरज जगताप ( DYSP), श्री. लक्ष्मण कसेकर (DYSP), श्री. सुरज गुरव (DYSP), श्री अनुप यादव (SDM) श्री. नितीन सहारे (प्रकल्प व्यवस्थापक, बार्टी) आणि सर्व समाज कल्याण व पोलिस अधिकारी कर्मचारी तसेच महसूल खात्यातील अधिकारी/कर्मचारी व स्थानिक सामाजिक संघटना व विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, तालुका समन्वयक, जिल्हा प्रकल्प अधिकारी व समतादूत तसेच इतर सामान्य नागरीक उपस्थित होते.
प्रास्ताविक श्री. बी. एस. दासरी, सहा. आयुक्त, समाज कल्याण जि. नांदेड यांनी केले.
कार्यशाळेत तज्ञ व्याख्याते श्री सुभाष केकाण यांनी कायदा व तरतुदी यावर सखोल अभ्यास पूर्ण मार्गदर्शन केले तर श्री गजानन पिंपरखेडे यांनी कायद्यातील उनिवा यावर भाष्य केले यासोबतच जिल्हा शासकीय अभियोक्ता श्री देशमुख यांनी अंमलबजावणी यंत्रणांची महत्त्वाची भूमिका विशद केली.
मनोगत व्यक्त करतांना पी. एस. बोरगांवकर अप्पर जिल्हाधिकारी यांनी संविधानिक तरतुदी याचे महत्त्व अधोरेखित केले आणि, श्री योगेश कुमार पोलिस अधिक्षक यांनी कायदा व तरतुदी यांचा सखोल अभ्यास सर्व अंमलबजावणी यंत्रणा यांना किती महत्त्वाचा आहे हे पटवून दिले तर नितीन सहारे यांनी बार्टी मार्फत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळा घेण्यामागची भूमिका मांडताना मा. सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग श्री सुमंत भांगे आणि आयुक्त समाज कल्याण डॉ. प्रशांत नारनवरे व बार्टीचे महासंचालक श्री. सुनील वारे यांचा कार्यशाळेसाठी दिलेला शुभेच्छापर संदेश उपस्थित यांना दिला व बार्टीमार्फत कार्यशाळा आयोजनाचे महत्त्व, सामाजिक सौहार्दता,आपापसातील भेद निर्मुलन व्हावे याकरिता मानसिक अस्पृश्यता नष्ट व्हावी व अंमलबजावणी यंत्रणा यांची संवेदनशीलता वाढविण्यासाठी बार्टी मार्फत घेण्यात येणारी कार्यशाळा याची भूमिका याचबरोबर बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व त्यांचे लाभ याविषयी मांडणी केली.
सुत्रसंचालन श्री. गजानन पांपटवार (तालुका समन्वयक नांदेड) यांनी केले.
कार्यशाळा व्यवस्थित पार पाडण्याकरिता श्री. राजेश सुरकुटलावार, कार्यालय अधिक्षक, समाज कल्याण विभाग, श्री. दिनेश दवणे, कनिष्ठ लिपिक, समाज कल्याण विभाग, श्री. सचिन नांदेडकर, प्रकल्प अधिकारी व श्री. सचिन गिरमे, डाटा एन्ट्री ऑपरेटर, बार्टी, पुणे , श्री सतीश वेताळ तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यशाळेच्या ठिकाणी उपस्थित राहून कामकाज पाहिले.
आभार व समारोप श्री. नितीन सहारे, प्रकल्प व्यवस्थापक, बार्टी, पुणे यांनी केले.