
@नागराळ ते कोनाळी मोड या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची उच्च स्थरीय चौकशीसाठी नागराळ ग्राम पंचायत समोर अमरण उपोषण
@२६ जानेवारी पासून उपोषण सुरु उपोषणाचा दुसरा दिवस
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी : तालुक्यातील नागराळ ते कोनाळी मोड या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून चालू आहे हे काम अतिशय निकृस्ट दर्जाचे होत असून सदर अभियंता व ठेकेदार हे संगनमताने शासनाची लूट करीत आहेत सदर कामाची त्रिसदस्यशीय चौकशी समिती नियुक्त करून चौकशी करण्यात यावी सदर कामाची राज्य गुणवत्ता निरीक्षक यांच्याकडून तात्काळ चौकशी करून अहवाल देण्यात यावा संबंधित अभियंता या कामात ठेकेदार यांना सहकार्य करीत आहे त्यामुळे त्याना निलंबित करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी नागराळ ग्राम पंचायत पुढे गिरीधर गायकवाड यांनी अमरण उपोषणास दि २६ जाने २०२५ रोजी सुरुवात केली असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे सदर काम एक वर्षापासून चालू असून सर्व रस्ता खोदून टाकला आहे नागराळ गाव अंतर्गत सिमेंट रस्ता करण्याचे काम चालू असून त्या कामाची उंचीही दहा इंच असून सदर काम चार इंच केले जात आहे सदर कामावर क्युब भरले जात नाही सदर कामाच्या मटेरियल तपासणी साठी कसलेली साधन व लॅब उपलब्ध नाही केलेल्या कामात एकाही माणसा समोर क्युब भरले नाहीत सदर कामावर ठेकेदार यांचा खाजगी अभियंता नाही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर वर कार्यरत असलेला शासकीय अभियंता चालू असताना एकदाही भेट दिली नाही किंवा कामावर उपस्थिती राहत नाही सदर कामे मुकदामाद्वारे केली जात आहेत त्यामुळे या कामाला दर्जा नाही त्यामुळे सदर रस्त्याची उच्च स्थरीय चौकशी करण्यात यावी
नागराळ येथील लोकांची पूर्णपणे गैरसोय केली आहे तर संबंधित ठेकेदार यांनी लोकांसाठी रस्त्याची पर्यायी व्यवस्था नाही त्यामुळे उदगीर टाकळी बोंबळी ही बस रात्री ठीक आठ वाजता नागराळ मार्गे जाणारी बस गेली एक वर्षांपासून बंद आहे शाळा महाविद्यालयाना ये जा करणारे विदयार्थी व जेष्ठ नागरिक यांची मोठी हेळसांड केली जात आहे यामुळे उपोषण करताच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे या विभागाचे उपविभागीय अभियंता व शाखा अभियंता यांनी नागराळ येथील कामावर भेट दिली कामासादर्भात उपोषण कर्त्यांनी क्युब, लॅब, खाजगी अभियंता,कामाची राज्य गुणवत्ता निरीक्षक यांचा तपासणी आव्हाल यांची मागणी केले असता कसलीही चौकशी न करता उडवा उडवीचे उत्तरे देऊन निघून यावरून ठेकेदार यांचे साठ लोठ असल्याचे दिसून येते तरी या कामाची मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी उपोषण कर्ते यांच्याकडून करण्यात आली आहे