देवणी / प्रतिनिधी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी तालुक्यातील हेळंब ग्राम पंचायत सभागृहात लोकनियुक्त सरपंच गोरख बालाजीराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थितीत देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे उपस्थित होते. यावेळी ग्राम पंंचायतीच्या वतीने सोंडारे यांचा शाल, फेटा, हार व श्री.विठ्ठलाची मुर्ती देऊन सत्कार  करण्यात आला.
यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना दीपावलीच्या सनानिमित्त नागरीकानी घ्यावयाची काळजी या विषयी बोलताना दीपावली मधे कोणीही परगावी जाता घरामध्ये दागिने,पैसे ठेऊन जाऊन नये.सुरक्षितता बाळगावे,चोर संधीचा फायदा घेऊन चोरी करण्याची शक्यता असल्याने चोरानपासून सावधान राहवे असे आवाहन केले.
यावेळी पोलिस साह्याक निरिक्षक पंकज शिनगारे, उपसरपंच दयानंद लाटे, ग्रामसेवक दत्ता गायकवाड माजी.उपसरपंच रणजित सावंत,ग्रा.प.सदस्य विश्वनाथ जवळगेकर,अंगणवाडी ताई,आशा कार्यक्रती,व गावातील नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp