

निर्धार समानतेचा प्रकल्प अंतर्गत युवा जागर अभियानाला मोठा प्रतिसाद
ग्रामीण महिला विकास संस्था देवणी,स्विसएड पुणे व यूरोपीयन युनियन
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील वीस गावात निर्धार समानतेचा प्रकल्प अंतर्गत युवा जागर अभियान सतरा मोठ्या गावामध्ये सुरुवात करण्यात आला आहे ग्रामीण महिला विकास संस्था देवणी स्विसएड पुणे व युरोपियन युनियन यांच्या सहकार्याने लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील १७ मोठ्या शाळा कॉलेजमध्ये छेडछाड, ताण-तणाव,व्यसन या विषयी अभियानाला सुरुवात करण्यात आली.या अभियानात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऍड. सुजाता माने व ऍड रुक्मिणी सोनकांबळे हे आहेत.अभियानाचा घेण्याचा उद्देश युवक,युवती छेडछाडीला विरोध करतील आणि निखळ मैत्रीचे नातेसंबंध तयार होतील तसेच व्यसनाचे परिणाम लक्षात येतील व त्यापासून दूर राहतील. युवकांमध्ये येणारे ताणतणाव ओळखुन सकारात्मक पर्याय समजतील या उद्देशाने पथनाट्य,पोस्टर प्रदर्शन, मार्गदर्शनाच्या माध्यमातून या अभियानाला २७ नोव्हेंबर पासून उद्देश्वर उच्च माध्यमिक विद्यालय सावरगाव येथु सुरुवात करण्यात आली व ६ डिसेंबर रोजी योगेश्वरी विद्यालय येथे समारोप करण्यात येणार आहे. या अभियानाला यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी ग्रामीण महिला विकास संस्थेच्या प्रमुख कुशावर्ता बेळे, गिरीष सबनीस, कचराताई गायकवाड, सत्यशीला सरवदे,सरोजा शिंदे प्रेरणा जाधव, विजयश्री बोचरे,कृष्णा इंगोले, विकास बिरादार, नागनाथ सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.