देवणी गोवंश संशोधन केंद अंबाजोगाईला करण्याच्या निर्णयाचा निषेध
देवणी / प्रतिनिधी :


देवणीचा वळु म्हनुन लातूर जिल्ह्ययाचे नाव देशपातळीवर निर्माण करणार्या देवणी गोवंश पांढराबांडा व लाल कंधारी हि जात मराठवाड्यातच नाही तर कर्नाटक, आंध्रप्रदेश,तेलंगना,या राज्यात शेती कामासाठी बैल व दुधासाठी गाय प्रसिद्ध आहे पण या जातीचा गोवंश नामशेष होण्याच्या मार्गावर असून याचे जतन व्हावे यासाठी संवर्धन व संशोधन केंद्र देवणी येथे व्हावे आशी मागणी आनेक वर्षापासून शेतकऱ्यांची होती पण परवा छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवणी गोवंश संवर्धन केंद्र अंबाजोगाई तालुक्यातील मौजे साकुड येथे उभारण्यात येणार आहे आसा निर्णय घेण्यात आला याचा जिल्ह्यातील शेतकर्यांच्या वतीने जाहिर निषेध जिल्ह्यात विधानसभेचे साहा व विधानपरिषदेचा एक शिक्षक आमदार एक आसे ऐकून आठ आमदार व या पैकी सतेत आसणार्या पक्षाचे प्रत्यकी दोन आमदार व कॅबिनेट मंत्रिपद व विरोधी पक्षाचे दोन आमदार असताना एकानेही मंत्रीमंडळाच्या बैठकीत या बाबद आवाज उठवला नाही सर्वजन मुग गिळून गप्प बसले हि अत्यंत दुर्दैवी बाब आहे, देवणी गोवंश हा देवणी तालुक्याचाच नाही तर लातूर जिल्ह्यच्या असमितेचा विषय आहे सरकारने हा निर्णय बदलून गोवंश संवर्धन व संशोधन केंद्र हे या जातीची मूळ पैदास देवणी येथे होते तिथेच उभा करावे या मागणीसाठी व निषक्रीय आमदार मंत्री यांच्या विरोधात शेतकरी संघटना जन आंदोलन उभा करनार आहे