
पंढरपूर येथे सर्व शाखीय सोनार समाजाचा राज्यस्तरीय सन्मान सुवर्णरत्नांचा २८ मार्च रोजी कार्यक्रम…-राजेश पंडित
पंढरपूर प्रतिनिधी–
अखिल सोनार समाज प्रतिष्ठान अंबेजोगाई व सर्व शाखीय सोनार हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७५ समाज रत्नाचा सन्मान व पुरस्कार प्रदान कार्यक्रम शुक्रवार दि. २८ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता आनंदीविनायक मंगल कार्यालय पंढरपूर वाखरी रोड पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला असल्याचे संयोजक राजेशभाऊ पंडित रेणापूरकर यांनी माहिती दिली आहे.

सोनार समाजाच्या ऐकतेसाठी, समाज संघटनेसाठी, समाज बलवान व समृद्ध होण्यासाठी अश्या कार्यक्रमाची गरज ओळखून दूरदृष्टी ठेऊन, समाजासाठी सतत कार्यरत लढवय्ये संघर्ष यात्री नेते राजेशभाऊ पंडित रेणापूरकर यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केली आहे.
सर्व शाखीय सोनार समाजातील अनेक समाज रत्ने समाजाच्या भल्यासाठी तन मन धनाने कार्यरत आहेत, अश्या ७५ रत्नाचा सन्मान व पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी पंढरपूर येथे शुक्रवार दि. २८ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता, “” आनंदीविनायक मंगल कार्यालय पंढरपूर – वाखरी रोड पंढरपूर “” येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री.काशीनाथराव पोतदार श्री.सुधाकरराव शहाणे,रमेशराव दिक्षित, संजयजी भाऊ बानकर, बालाजीराव दिक्षित,सचिनजी बानकर,श्रीनिवासजी बानकर,व्यंकटेश वाशिंबेकर,विनोदजी पोतदार,मुकूंदजी वेदपाठक,रविशंकर धर्माधिकारी,चंद्रकांत दादा वेदपाठक,तसेच शशीकांत पोतदार,विशाल कोन्हेरीकर,सारंग महामुनी, सुमित पारखे, विशाल दिक्षित, सुनिलराव पंडित,विलासराव दिक्षित, गजानन कंचले,मोहनराव पोतदार,गिरिष शहाणे,पांडुरंग महामुनी, श्रीकांत घोडके,व ,सौ.मनिषा राजेश पंडित, सौ.माधवीताई पोतदार,मा.विजयाताई दहिवाळ,ह.भ.प.अर्चनाताई मुकूंदराव वेदपाठक,ईत्यादीनी विनंती केली आहे.
तरी महाराष्ट्रातील सर्व शाखीय सोनार समाज बांधवानी कार्यक्रमास वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक श्री राजेशभाऊ पंडित रेणापूरकर यांनी केली आहे.तसेच”भव्य दिव्य अश्या या कार्यक्रमांस समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.