पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकुन बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या विरोधात देवणी पोलीसात तक्रार
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी सोशल नेटवर्किंग साईट वर पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करुन समाज माध्यमावर पोस्ट टाकुन बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या कृष्णकुमार विठ्ठलराव देवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत श देवणी तालुका पत्रकार संघ देवणीच्या वतीने देवणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे
पत्रकारांच्या वतीने दिसलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांवर आक्षेपार्ह टिप्पणी व बदनामीकारक चुकीचा मजकूर लिहून देवणी तालुक्यातील बोरोळ येथे आरोपी कृष्णकुमार विठ्ठलराव देवणे याने (दि.११) रोजी शनिवारी एका वृत्तपत्रांतील बातमीच्या मथळ्याखाला धरून बातमीला टॅग करून सोशल नेटवर्किंग साईट वर पत्रकारांबद्दल चाटुगिरी करणारे गुलामगिरी करणारे पत्रकार ,बिकाऊ पत्रकार म्हणून बदनामीकारक पोस्ट लिहून सोशल मीडियावर अनेक व्हाट्सअप ग्रुप वर टाकले आरोपी एवढ्यावरच न थांबता यानंतरही (दि.१२) रोजी दैनिक पुढारीच्या बोरोळमध्ये आचारसंहिता भंग या मथळ्याखाली असलेल्या बातमीला धरून अनेक व्हाट्सअप ग्रुप वर अनेकदा दो कौडी का पत्रकार, विकाऊ पत्रकार म्हणून पेपरची व पत्रकार व संपादकांचीही षडयंत्र करी म्हणून सांकेतिक चिन्ह वापरुन पत्रकारांची बदनामी केली व बातमी छापण्यासाठी किती पैसे घेतलास म्हणून बदनामी केली एवढ्यावरच न थांबता (दि.१३) रोजी पुन्हा दैनिक तरुण भारत कार्यकर्त्याकडून आचारसंहितेचे उल्लंघन; निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल या मथळ्याला टॅग करून आक्षेपार्ह विकाऊ पत्रकार म्हणून लिखाण केलं मागील तीन दिवसापासून अनेकदा पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करून कृष्णकुमार विठ्ठलराव देवणे हा सतत पत्रकारांची बदनामी करण्याचे काम करत असून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आज पर्यंत पत्रकारांचे कार्य सर्वश्रुत आहे हा खोडळसाळपणा कररून आरोपी कृष्णकुमार देवणे यांनी केलेल्या कृत्याबद्दल गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी दिसलेल्या तक्रारीत करण्यात आले आहे दिलेल्या तक्रारीत प्रा.रेवण मळभगे, प्रताप कोयले,गिरीधर गायकवाड,राहूल बालुरे,वैजनाथ साबणे,जाकीर बागवान,प्रमोद लासोने,लक्ष्मण रणदिवे,शकील मनियार,भैय्यासाहेब देवणीकर, बालाजी कवठाळे,जयेश ढगे यांच्या सह्या होत्या