“पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील”यांची जयंती “शेतकरी दिना”निमित्त सोयाबीन शेतीशाळा लाभार्थ्यांना शेतकरी किट वाटप.
देवणी / प्रतिनिधी :
नारळी पौर्णिमेनिमित्त पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती क्रषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी दिन म्हणून तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आले. या प्रसंगाचे औचित्य साधत प्रकल्प संचालक आत्मा श्री एस व्ही लाडके आणि तालुका कृषी अधिकारी श्री एस आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी श्री बी एम जाधव यांच्या नियोजनाने आत्मा योजनेअंतर्गत वडमुरंबी येथील भूलक्षमी ऍग्रो फार्मर प्रोडूसर कंपनीचे डायरेक्टर आणि प्रगतिशील शेतकरी सोमनाथ स्वामी यांच्या प्रक्षेत्रावरती “सोयाबीन टोकन” या विषयावर तिच्या शेती शाळेच्या चौथ्या वर्गाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती देवणी चे कृषी विस्तार अधिकारी श्री गोपनवाड साहेब यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागांतर्गत बिरसा मुंडा योजना, त्याचबरोबर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन कृषी योजना, पंचायत समितीच्या शेष निधी अंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या सोयाबीन टोकन, स्पायरल सेपरेटर ,कडबा कुट्टी, आणि सध्या नवीन योजनेअंतर्गत बायोगॅस स्लरी फिल्टर इत्यादी योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. तालुक्याचे बीटीएम श्री राहुल जाधव यांनी पावसाचा जवळपास 30 दिवसाचा खंड पडलेला असून सध्या सोयाबीन पिकास पाण्याची गरज आहे ज्यांच्याकडे शाश्वत सिंचन योजना आहे त्यांनी सोयाबीन पिकास पाणी द्यावे तसेच सोयाबीन तूर मूग उडीद इत्यादी पिकास पाण्याचे ताण व्यवस्थापन अंतर्गत 13 :0:45 त्याचबरोबर सूक्ष्म मूलद्रव्य ग्रेड टू यांची संमिश्र फवारणी प्रति लिटर दोन ग्रॅम प्रमाणे करावी त्याचबरोबर सोयाबीन येल्लो मोझैक या रोगाविषयी जनजागृती बाळगून प्रादुर्भाव ग्रस्त रोपटे उपटून समूळ नष्ट करावे आणि एकरी 20 ते 25 पिवळे चिकट सापळे लावावेत आणि ऊस पिकावर ती सध्या लोकरी मावा जास्त प्रमाणामध्ये दिसून येत असून त्याबाबत शेतकऱ्यांनी जागरूकता बाळगून युरिया खताचा प्रमाणापेक्षा जास्त वापर करू नये असे आवाहन केले. पंचायत समिती चे विस्तार कसे अधिकारी श्री हैबतपुर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बांबू लागवड याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून बांबू पिकाच्या वेगवेगळ्या प्रजाती खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन विक्री व्यवस्थापन आणि बांबू पिकास असणाऱ्या सबसिडीचे बाबत सविस्तर मार्गदर्शन करून वडमुरंबी गावातील शेतकऱ्यांनी कमीत कमी 40 एकर बांबू लागवड करणे संदर्भात मार्गदर्शन करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली. सोयाबीन टोकन शेती शाळेचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून महादेव वाडी येथील पुरस्कार प्राप्त शेतकरी ओमकार माणिकराव मस्कले यांनी सोयाबीन पिकातील मित्र कीटक कसे ओळखावे यांची प्रत्यक्ष डिजिटल चित्र पुस्तकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती देऊन कामगंध सापळे वॉटर ट्रॅप पिवळे चिकटसापळे निळे चिकट सापळे फुलमाशी फळमाशी मावा तुडतुडे इत्यादी कीटक विषयी सखोल मार्गदर्शन करून वेगवेगळ्या कामगंध शस्त्रोक्त पद्धतीने वापर व व्यवस्थापन याचे मार्गदर्शन करून शेतकऱ्यांनी किमान स्वतःच्या घरी एक तरी देशी गाय ठेवावी असे आवाहन केले.
डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्मदिवस “शेतकरी दिन” म्हणून साजरा करण्यात आला याप्रसंगी आत्मा योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या शेती शाळेतील 25 लाभार्थ्यांना शेतकरी उपयोगी शेतकरी किट वाटप करण्यात आली आणि गावातील शेतकरी गटातील वेगवेगळ्या पिकामध्ये विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सन्मान करण्यात आला. नागार्जुना कंपनीचे उदगीर विभाग स्तरीय अधिकारी श्री आशिष बिराजदार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी करते वेळेस घ्यावयाची काळजी आणि दुष्परिणाम त्याचबरोबर फवारणी किट चा योग्य वापर याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी बी.एम जाधव, पंचायत समितीचे कृषी अधिकारी गोपनवाड साहेब पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी हैबतपुर साहेब, भू- लक्ष्मी अग्रो फार्मर प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष सोमनाथ स्वामी, प्रगतिशील शेतकरी शिवराज स्वामी, कार्तिक स्वामी, प्रगतिशील सोयाबीन टोकन शेतकरी फाल्गुन बिरादार शेती शाळेचे तज्ञ प्रशिक्षक श्री ओमकार माणिकराव मस्कले, बी टी एम राहुल जाधव, एटीएम श्रीमती माया श्रीनामे, नागार्जुना कंपनीचे उदगीर विभाग प्रतिनिधी अश्विन बिरादार त्यांचे सहकारी व भूलक्षमी ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी मधील शेती शाळेतील सर्व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

