परळी वैजनाथ नटराजरंग मंदिर आशा वर्कर यांना कोरोना योध्दा २०२०-२१ सन्मान पुरस्कार सन्मानित
देवणी / विशेष प्रतिनिधी(एम.बि.टाळीकोटे) :
परळी वैजनाथ येथे नटराजरंग मंदिर शनिवारी या दिवशी पंचायत समिती परळी वैजनाथ यांच्या मार्फत कोरोना योध्दा २०२०-२१ चा सन्मान सत्कार करून आशा स्वयंसेविकांना जवळ पास २५० आशा स्वयंसेविकांना कोरोना योध्दा म्हणून सन्मानित व सत्कार करण्यात आले या कार्यक्रमाला मा, बालाजी मुंडे सभापती पंचायत समितीचे परळी वै,मा, संजय केंद्रे, गटविकास अधिकारी, डॉ, लक्ष्मण मोरे तालुका आरोग्य अधिकारी,मा, जानी मियाँ कुरेशी उपसभापती प, स,परळी वै, गटप्रवर्तक आशा मुंडे, सुनिता काळे, आशा स्वयंसेविका छाया झेंटिगराव रणदिवे यांच्या सह २५० आशा स्वयंसेविका सन्मान सत्कार करण्यात आले, संकटं येताच घराबाहेर पडतो, आणि आव्हानाला भिंडतो – तो योध्दा जगावर आलेल्या कोविड १९ कोरोना या महामारीच्या संकटात आपण स्वतः जीवाची पर्वा न करता घरदार विसरून आलेल्या संकटाला न घाबरता स्वतः साठी स्वतः साठी नाही तर लोकांसाठी काम नव्हे तर कर्तव्य या जाणिवेतून आपल्याकडून होत असलेले कार्य आपण केले आपल्या या सेवेत मोल कशातही मोजता येणार नाही आपण सर्वांनी दिलेल्या सेवेबद्दल प्रशासनाच्या वतीने आपल्या कार्याची दखल घेत आपल्याला कोरोना योध्दा म्हणून सन्मानित केले, आहेत, या कार्यक्रमाला परळी वैजनाथ येथील सर्व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.