जिह्यातील जय जवान,जय किसान व डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर दोन्ही कारखाने सुरू होणार..!
मन्नोज कनाडे ठरले शेतकऱ्यांचे हितचिंतक
देवणी / प्रतिनिधी रणदिवे लक्ष्मण
देवणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सचिव मनोज कन्नाडे यांनी लातूर जिल्हा निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर व नळेगाव येथील जय जवान जय किसान साखर कारखाने त्वरित चालू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा देशाचे माजी कृषि मंत्री शरदचंद्र जी पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती सदर निवेदनाची दखल घेऊन ही दोन्ही कारखाने ट्वेंटीवन शुगरकडे भाडे तत्ववावर देण्याचा निर्णय राज्य बँकेने घेतलाआहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर दोन्ही कारखान्याचे मशनरी पूजन होणार आहे हे दोन्ही कारखाने जिल्ह्यात नव्हे तर मराठवाड्यात सर्वाधिक गाळप क्षमता असलेले कारखाने असून जिल्हयात कितीही उस उत्पादन झाले तरी त्याचे वेळेत गाळप होऊन लातूर जिल्ह्यातील सर्वच शेतकरी यांना सुजलाम सुफलाम करणारे यांच्या हिताचे होणार आहे हे कारखाने प्रदीर्घ काळापासून बंद असल्याने महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर असल्याने शेतकरी यांची मोठी हेळसांड होत आहे शेतातील ऊस त्यांच्या मुद्दतीत गाळप होत नसल्याने सदर उसाचे वजन घटून शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे पैसे कधिही द्या परंतु आमच्या शेतातील ऊस बाहेर काढा अशी हाक शेतकरी देत होते याची हाक ऐकून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते राज्याचे सचिव मनोज कन्नाडे शेतकरी यांच्या व्यथा वेदना माजी कृषि मंत्री यांच्या कडे मांडल्या मुळे यावर सविस्तर चर्चा होऊन ही ऊस कारखाने तात्काळ चालू होतं आहेत. यावेळी आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी चर्चा केली असता कृषिरत्न मा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे ऋण व्यक्त करून,हे दोन्ही कारखाने भाडेतत्त्वावर घेण्यासाठी पुढाकार घेतलेले लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.ना.अमित भैया देशमुख साहेब, यांचे आभार मानले.