पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय गगनबावडा येथील वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र या विभागांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम घाटातील दुर्मिळ वनस्पती आणि वनौषधी, भौगोलिक रचना आणि वन्य प्राणी, पक्षी, कीटक यांच्या अभ्यासासाठी एक दिवसीय अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले. अति दुर्गम, डोंगराळ, अतिवृष्टी आणि अतिमागास असलेल्या या भागात प्रवासी, पर्यटक आणि अभ्यासकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा भागात स्थित असलेले हे महाविद्यालय विद्यार्थ्यांसोबत सातत्याने अशा अभ्यास सहलींचे आयोजन करत असते. निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या आय.यू.सी.एन या जागतिक संस्थेने निर्धारित केलेल्या भारतातील जैवविविधतेच्या आठ ठिकाणापैकी एक असलेले म्हणून पश्चिम घाटाकडे पाहिले जाते, या अनुषंगाने येथील अतिदुर्मिळ प्राणी, कीटक, फुलपाखरे, वनभाज्या, वनौषधी ह्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांची माहिती, अभ्यास विद्यार्थी आणि सर्वसामान्यांना होणे गरजेचे आहे यासाठी अशा सहलींचे सतत आयोजन करण्यात येत असते. या आयोजनासाठी प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांचे मार्गदर्शन तसेच आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सतिश देसाई, संस्था सचिव प्रा. डॉ. विद्या देसाई यांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन लाभत असते. या अभ्यास दौऱ्याचे संयोजन वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संतोष भोसले आणि प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. राहूल कांबळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp