
मानवी हक्क अभियान संघटनेच्या वतीने या दलित स्मशानभूमीसाठी उभारणार लढा — लक्ष्मण रणदिवे
देवणी लक्ष्मण रणदिवे
देशातल्या दलितांचे सर्व स्तरांवर हाल होत असुन त्यांचे जीवन अनेक समस्याने ग्रासलेले आहे,यात भुमिहीन मजुरांचा भरणा मोठ्या प्रमाणात असुन यांचेकडे श्रमशक्ती शिवाय जगण्याचे दुसरे कुठलेही साधन नाही,आणि यामुळे त्यांच्या मुलभुत गरजा तर भागतचं नाहीत,जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि मुत्युनंतर सुध्दा ते दुर्दैवी ठरतं आहेत,हालतीत जन्म हालतीत वाढ आणि हालतीत मृत्यू.आणि मृत्यू नंतरही पार्थिव देहाचे हाल अशी अवस्था दलितांच्या नशिबी हजारों वर्षांपासून चालत आली आहे.आसाचं एक प्रकार लातुर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ तालुक्यात दिसुन आला.पांढरवाडी येथील लक्ष्मीबाई संग्राम वाघमारे या दलित महिलेचा निधन झाले होते,येथील दलितांना अजिबातचं स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने सदर महिलेचा आंतविधी रस्त्यावरचं करण्यात आला आहे,सदर दलितांच्या स्मशानभूमीच्या वहीवाटी जमिनीवर आंतविधी साठी मज्जाव केला जात असल्याचे हा दुर्दैवी प्रकार घडला आहे,या दुर्दैवी घटनेची माहिती मानवी हक्क अभियानाचे लातुर जिल्ह्य उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांना कळताच त्यांनी सदर प्रकाराची माहिती घेऊन पिडीत दलितांना मानसिक आधार देऊन स्मशानभूमी कायदेशीर रित्या मिळवून देण्यासाठी मानवी हक्क अभियान सक्षम असुन या प्रश्न सोडवणुकीसाठी पीडितांच्या बरोबरीने पाठपुरावा करणारं असल्याची माहिती मिळेल लक्ष्मण रणदिवे यांनी सदर प्रकरणा विषयी बोलताना सांगितले.येत्या काळात मानवी हक्क अभियान हा प्रश्नावर सोडवुणीकीवर विशेष लक्ष देऊन हे प्रश्न सोडविणार असल्याची माहिती ही लक्ष्मण रणदिवे यांनी दिली आहे. या दलित स्मशानभूमीसाठी आनंत साळुंखे जिल्हाध्यक्ष ,मारुती गुंडले लातूर जिल्हा सचिव, कैलास गायकवाड मानवी हक्क अभियान जिल्हाध्यक्ष ठाणे, गजानन गायकवाड देवणी तालुका अध्यक्ष डी एन कांबळे देवणी कार्याध्यक्ष, अनिल घोडके हरिभाऊ राठोड अश्विनी वाघमारे जळकोट तालुका शाहूराज शिंदे शिरोळ अनंतपाळ तालुका अध्यक्ष लहुजी शक्ती सेना याचा सह मानवी हक्क अभियान संघटनेच्या वतीने पांढरेवाडी समशानभूमीसाठी पाठपुरावा करणार