माझ्या मराठ्यांचा लढा अपूर्ण राहिला का?
मराठ्यांना सरसकट किंवा 15 टक्के आरक्षण मिळाले का?
जरागें पाटील युद्धात जिंकले पण तहात हरले?
एवढे मोठे आंदोलन सपशेल फेल झाल आहे का?
मराठा समाज सावधान हा अध्यादेश म्हणजे समाजाची दिशाभूल करणारा आहे. हा अध्यादेश नसून अध्यादेश चा मसुदा आहे. कारण हे वटहुकूम नाही त्याला कायद्याचे स्वरूप नाही.कारण यावर हरकती मागविल्या आहेत आणि त्याची 16 फेब्रुवारी पर्यंत मुदत दिली आहे. आता हजारो हरकती येणार जसे की सदावर्ते साहेब,भुजबळ साहेब, अनेक ओबीसी नेते संघटना अगोदरच नाराज होते की मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देवु नका म्हणून आता ते सर्वजण यावर हरकती घेतीलच आणि
ते कोर्टात ही जातील आणि ते त्यांचा हक्क आहे.
त्याचा फेरविचार करावा लागेल आणि त्यानंतर निर्णय घेण्यात येईल हा जी आर नसून अध्यादेशा चा मसुदा आहे. या आधीच विदर्भात खानदेशात मराठवाडय़ातील काही लोकांना कुणबी प्रमाणपत्रे जुन्या काळात मिळाल्या आहेत यात नवीन काय आहे. म्हणजे ज्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे मिळणार नाही त्यांना आरक्षण मिळणार नाही. सगेसोयरे चा मुद्दा शिंदे सरकार आम्ही मान्य केला आहे असे म्हणतात पण त्यात पण अर्जदारांचे वडील आजोबा पणजोबा आणि जाती संबंधातील लग्न झालेल्या सगेसोयरे यांनाच गृहीत धरले आहे. पाटलांची मागणी होती की आई कडील नातेवाईक यांना सुद्धा सरसकट आरक्षण मिळावा पण स्त्री आई दुसर्या जातीची असेल तर त्यांना आरक्षण मिळणार नाही. आणि ही जी अट सगेसोयरे यांची आहे ती 1967 सालापासून आहे त्यात नवीन काही नाही. मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालेला नाही किंवा 15 टक्के सुद्धा आरक्षण मिळालेला नाही. जे मराठे कुणबी प्रमाणपत्रे सादर करतील त्यानाच आरक्षण मिळेल. आता अवलंबून राहावे लागेल सुप्रीम कोर्टाच्या क्यूरेटिव पिटीशन वर आणि त्यासाठी सर्वे करून सुप्रीम कोर्टात ईमपेरीकल डेटा सादर करावा लागेल आणि त्यासाठी मराठा समाजाला आपले शैक्षणिक आर्थिक सामाजिक मागासलेपण सिद्ध करावे लागेल आणि ते हाईकोर्ट मध्ये टिकवावे लागेल.
आणि त्यासाठी सर्वे करण्यासाठी शिंदे सरकारने सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना घाई गडबडीत ट्रेनिंग दिली कागदोपत्री आणि त्यांना जे मोबाइल aap दिला आहे ते पण नीट काम करत नाही आणि कुठे नेटवर्क नाही तर कुठे अयोग्य कर्मचारी ज्यांना याची काहीही माहिती नाही असे कर्मचारी डेटा
गोळा करण्याचे काम करत आहेत. खर तर यावर पाटलांनी लक्ष वेधले पाहिजे होते. कारण सर्वात महत्वपूर्ण काम पुढील लढ्यासाठी हेच आहे.
मी
मराठा समाजाच्या आंदोलनाचा व पाटलांचा समर्थक
– सरदार शेख