पाणी निचऱ्याकरिता लातूर शहर पूर्व भाग कृती समितीने लावले मुख्य रस्त्यावर बेशर्माचे झाड.
—- समितीने मनपाचा जाहीर निषेध करीत तीव्र आंदोलन छेडण्याच्या दिला इशारा.

लातूर :— येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील मुख्य रस्त्यावर गेली 5 वर्षापासुन प्रत्यक पावसाळ्यात पाणी साचून या रस्त्यावर जलाशया सदृश्य परिस्थिती निर्माण होत असून नेहमी पाणी साचून रोडवर खड्डे पडले असल्याने पाण्यात खड्याचा अंदाज येत नसल्याने रोज अपघात घडत असताना पहायला दिसून येतात या मार्गावर रहदारी करणाऱ्या शाळेतील विद्यार्थी, पालक भगिनी, नागरिकांसह वाहन चालकांना येथून ये जा करण्यासाठी कसरत करावी लागत असून डेंगू सारख्या सदृश रोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता व रोगराई पसरण्याची भीती नागरिकात निर्माण झाली आहे.
आंबेडकर चौकातील नागरिकांना रोडवर साचलेल्या घान पाण्यापासून येणाऱ्या समस्यांकडे महानगरपालिका लातूर यांचे लक्ष वेधून घेण्याकरिता लातूर शहर पूर्व भाग नागरी कृती समितीच्या वतीने वेळोवेळी अनेक आंदोलने, निवेदने देऊनही लातूर शहर महानगरपालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने आज समितीच्या वतीने या मार्गावर बेशर्माच्या झाडाचे वृक्षारोपण करून मनपाला जागे करण्यासाठी आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा असा नारा देत याप्रसंगी महानगरपालिका कारभाराचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी लातूर शहर महानगरपालिके कडून विकास कामात नेहमी लातूर शहर पूर्व भागावर अन्याय केला जात असल्याचा गंभीर आरोप समिती कडून करण्यात येऊन महानगरपालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील नांदेड रोडवरील सखल भागात पावसाळ्यात साचत असलेल्या पाणी निचऱ्याकरिता तात्काळ उपाय योजना राबविण्यात याव्यात, अन्यथा येणाऱ्या पुढील काळात लोकशाही मार्गाने याहीपेक्षा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लातूर शहर पूर्व भाग नागरी कृती समितीचे अध्यक्ष दीपक गंगणे, सचिव बाबासाहेब बनसोडे, पत्रकार नितीन चालक, डॉ. संजय जमदाडे, शंकर जाधव, बाळासाहेब कटके,भगवेश्वर धनगर,कमलाकर कांबळे,सुधीर चंबूले,गौतम ससाणे,मुकूंद बनसोडे,जीवन कांबळे,लहू कांबळे, रवी कांबळे,विक्रम गायकवाड, दत्ता सूर्यवंशी, करीम गायकवाड, भीमा सुर्यवंशी, श्रीनंद गायकवाड, प्रा राजहंस धसवाडीकर,कोंडीबा पडोळे,लहू कांबळे, आदींच्या वतीने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp