
पीक कर्ज चालू ठेवण्याचे सोसायटी देवणी कडून शेतकऱ्यांना आवाहन
देवणी.कमलवाडी.डोंगरवाडीसंयुक्त सोसायटी
देवणी प्रतिनिधी पांडुरंग कदम
देवणी सोसायटी संबंधित सर्व पीक कर्ज सभासदांना विनंती करण्यात येते की. दरवर्षीप्रमाणे आपण आपले पीक कर्ज नूतनीकरण सहा टक्के व्याजदर प्रमाणे व्याज व मुद्दल रक्कम भरून चालू करून घ्यावे. उर्वरित तीन टक्के व्याजाची रक्कम यापूर्वीच शासनाकडून आपल्या बचत खात्यात जमा करण्यात आलेली आहे.
एकूण सरासरी 6 टक्के परिपूर्ण व्याजदर चालू पीक कर्ज खातेदारांना शासनाकडून लाभांश देण्यात येते. लाभ मिळण्याकरता पीक कर्ज चालू असणे गरजेचे आहे.
शेतकरी पीक कर्ज धारकामध्ये कर्जमाफी होण्याकरिता अशा लागलेली असून थकीत कर्ज ठेवण्याची संभ्रमता निर्माण झाली आहे.
2025 मध्ये पिक कर्ज थकीत ठेवल्यास. चालू कर्जामध्ये सुद्धा बसणार नाही व थकीत मध्ये सुद्धा निकष बसणार नाही. याबद्दल आपले नुकसान करून घेऊ नये
तसेच दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे थकीत कर्ज झाल्यास सभासद म्हणून सोसायटी च्या मतदार यादीत नाव समाविष्ट राहणार नाही. चालू कर्जदार शेतकरी मतदान हक्क मिळणे करिता पात्र राहतो असा निकष आहे. तसेच. शासनाचा कर्जमाफी घोषित झाल्यास
चालू कर्जमाफीचा लाभ परिपूर्ण मिळेल सहा टक्के व्याजाचा लाभ मिळेल
कृपया सर्व शेतकरी सभासदांना विनंती की आपण आपले पीक कर्ज चालू करून घ्यावी वरील होणारे नुकसान टाळण्यात यावे. याची जबाबदारी सर्व शेतकरी पिक कर्ज धारक यांची राहील असे आवाहन विविध कार्यकारी सेवा सहकार सोसायटी मार्फत करण्यात येते.
चेअरमन विजयकुमार लुले
व्हा.चेअरमन शिवाजी तपसाळे
संचालक पांडुरंग कदम
सचिव मुरहारी शिवनखेडे
व सर्व संचालक मंडळ देवणी जिल्हा लातूर