
दि. ०८ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२३ दरम्यान युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य तसेच मूर्ती आणि शिल्प संशोधन संस्था औरंगाबाद शाखा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे जिल्हा बौध्द लेणी अभ्यास दौरा यशस्वीरीत्या संपन्न झाला. कोल्हापूर मधील दसरा चौकातील धम्मधर राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या अभ्यास दौऱ्याची सुरूवात झाली. या अभ्यास दौऱ्यामध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि मावळ लेणी समूहातील लेण्यांचा सखोल अभ्यास करण्यात आला. यामध्ये नाणेघाट, तुळजा लेणी, कपिचीत (लेण्याद्री) लेणी, शिवनेरी लेणी, अंबा अंबिका लेणी, भूत लेणी, बेडसे लेणी आणि कार्ला लेणीना भेट देण्यात आली. लेण्यांची रचना, तेथील शिल्पकला, मूर्तीकला, शिलालेख, त्यांचा इतिहास आणि प्राचीनत्व, निसर्गसौंदर्य, लेणीवर झालेले दैविकरण या बाबींची इतंभूत माहिती मिळाली. छ. शिवरायांची जन्मभूमी पाहणे हे मराठी माणसाचे स्वप्न असते, किल्ले शिवनेरीला तब्बल चार तास वेळ देण्यात आला. शिवनेरीवर जवळपास ८४ लेण्या आहेत त्यापैकी काही लेणी पाहण्यात, अभ्यासण्यात आल्या. पुण्यातील तळेगांव दाभाडे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाला भेट देण्यात आली. बौद्ध लेण्या या जागतिक वारसास्थाने आहेत, त्यांचा अभ्यास करणे, त्यांना वारंवार भेटी देणे, सर्वसामान्यात त्यांचा प्रचार प्रसार करणे, त्यांचे जतन आणि संवर्धन करणे, त्यांच्याप्रती आपुलकी आणि श्रद्धाभाव निर्माण करणे यासाठी असे अभ्यास दौरे युवा बौद्ध धम्म परिषद सातत्याने आयोजित करत आलेली आहे, हा अभ्यास दौरा “२२ वी धम्मचारिका” या नावाने संपन्न झाला. या अभ्यास दौऱ्यात प्रसिध्द धम्मलिपी आणि बौद्ध पुरातत्वशास्त्राचे गाढे अभ्यासक आयु. अशोक नगरे यांनी मार्गदर्शन केले. युवा लेणी संवर्धक आयु. आनंद खरात तसेच पुरातत्वशास्त्र अभ्यासक आयु. मकरंद लंकेश्वर, आयु. अमोल गायकवाड, आयु. मंगेश रोकडे, आकाश पाटील, तोडकर साहेब, प्रतिक नकाते इत्यादी मान्यवरांचे मोलाचे सहकार्य मिळाले. युवा बौद्ध धम्म परिषद चे राज्याध्यक्ष डॉ. संतोष भोसले आणि कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अभि. बापूसाहेब राजहंस यांनी दौऱ्याच्या नियोजनात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. या अभ्यास दौऱ्यात रविंद्र दामोदर हलसवडेकर, भगवान यशवंत बुचडे, आनंदराव हणमंत कुरणे, शीला आनंदराव कुरणे, मनोहर कृष्णा मुचंडी, संजीवन नामदेव लोंढे, पल्लवी प्रकाश कांबळे, मंगल दगडू धावारे, काकासाहेब भाऊ कुरळूपे, नागनाथ मल्लिकार्जुन सोनकांबळे, बाबासाहेब हणमंत माने, अरहत कृष्णा कांबळे, प्रवीणकुमार किंकर पालके, भगवान राजाराम कांबळे, अजित निवृत्ती कांबळे, दत्तात्रय कांबळे, रघूनाथ बापूसो चव्हाण, सुभाष बापूराव ऐतवडेकर, स्मिता सुभाष ऐतवडेकर, सुनील आप्पाना कांबळे, सुनिता सुनील कांबळे, डॉ. चंद्रशेखर नामदेवराव मुळे, संदेश पाटील, मनोहर मुचंडी हे अभ्यासक सहभागी झाले होते.