एक स्वप्नं..!!
कसं काय पाटील?
पेशवे आणि फडणवीस स्वप्नात दिसले. त्यांचा संवाद असा झाला.
पेशवे : काय कसा चाललाय कारभार?
फडणवीस : एकदम मस्त, अगदी उत्तम.
पेशवे : व्वा छान! मराठे काय करताहेत?
फडणवीस : बोंबलतात नुसते; आणखी काय?
पेशवे : ….आणि शेतकरी?
फडणवीस : आत्महत्या करून मरताहेत.
पेशवे : छान. विरोधक त्रास तर देत नाही ना?
फडणवीस : छे; मुळीच नाही. त्यांचे हात दगडाखाली दबलेले आहेत ना;आणि वर आम्ही विराजमान आहोत.एकदा लालू, छगनला आत दाबले.आता सगळे कसे शांत चिडीचूप बसले.
पेशवे : म्हणजे पेशवाई पुन्हा आली असं समजू का?
फडणवीस : अर्थात.
पेशवे : तरी पण काही लोक गडबड करत असतील ना?
फडणवीस : काही म्हणतात ‘आम्ही फार शिकलो’.भुंकतात लेकाचे गल्लीत.पण ते दुसऱ्या गल्लीतल्या कुत्र्यांना जवळ येऊ देत नाही.
पेशवे : तरी पण त्यांची भीती असेलच ना?
फडणवीस : बिलकुल नाही. अशांच्या समोर ऊष्टी हाडे टाकली की; ते आपल्यावर भुंकण्या ऐवजी आपसातच एकमेकांवर भुंकत राहतात. त्यामुळे काळजी करू नका.
पेशवे : आणखी दुसरा काही इलाज केला आहे का?
फडणवीस : केला ना. एक नाही; अनेक केले.
पेशवे : ते कोणते?
फडणवीस : आम्ही प्रथम खाजगीकरण केलं.हळूहळू आरक्षण संपवलं. सवलती कमी केल्या. सोबतच शिक्षण महाग केलं. त्यामुळे ओ.बी.सींनी शिकणं कमी केलं.
पेशवे : अरे व्वा! शिक्षणाची दारं खिडक्या उघडल्या तरी….?
फडणवीस : आम्ही शाळेत अशी खिचडी शिजवली की ती खाऊन मुलं पेंगायला लागतात आणि शिक्षकांना हिशोब लिहिताना खालचं वर आणि वरचं खाली करायला भरपूर सवड मिळते. इतकेच नव्हे तर ईयत्ता आठवीपर्यंत नापास होण्याची भीतीच नसल्याने पालक ही खूष आहेत.
पेशवा : त पुढं काय?
फडणवीस : आम्हाला नवं शैक्षणिक धोरण तयार करण्यास पुरेसा वेळ मिळाला.
पेशवे : पण ओबीसी कोमात असले तरी; ते मराठे आंबेडकराची बाजू घ्यायला लागले ना?
फडणवीस : काही काळजी करू नका. आता आम्ही नवे शैक्षणिक धोरण आणले. नवा अभ्यासक्रम तयार केला. पुन्हा नव्या रूपात नव्या तंत्रज्ञानाने वैदीक शिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे तेही मंदिराचा कळस उभारण्यास हातभार लावतील.
पेशवा :- शाबास! बराच आत्मविश्वास आहे…!
फडणवीस : तुम्हीच तर आदर्श आहात आमचे.
पेशवे : आमच्या वेळी एक बरं होतं. सर्व शुद्र म्हणजे तुमचे ते ओबीसी, अस्पृश्य आणि इतर सर्व जाती-धर्माचे ढेकळं बिनडोक होते. पण आता तुमच्या विरोधात येवढा मोठा हिमालय असताना….
फडणवीस : सोप्पं आहे.
पेशवे : म्हणजे ते कसं काय?
फडणवीस : अहो आता लोकशाही आहे. लोकंच निवडून देतात आम्हाला. कोणतंही बटन दाबलं तरी मत आम्हालाच.
पेशवे : म्हणजे….?
फडणवीस : अहो EVM
पेशवे : म्हणजे? बाकीचे लोक अजूनही बिनडोक आहेत? त्यांच्या लक्षात येत नाही का हे?
फडणवीस : त्याचं असं आहे, EVM बनवणारी कंपनी आमची, साफ्ट वेअर बनवणारी कंपनी आमची, टेंडर काढणारी कंपनी आमची, निवडणूक आयोग आमचा, इतकेच नव्हेतर न्यायाधीश ही आमचेच.
पेशवे : मग?
फडणवीस : मग काय; जाणार कुठे?
पेशवे : तरी पण…
फडणवीस : त्याचं असं आहे ; मतदान सुरू करण्याआधी जेंव्हा एक बटन दाबलं जातं तेव्हा मतदानासोबत आम्हास हवं असलेलं साफ्टवेअर क्रियाशील होतय; आणि मतदान संपल्यानंतर बंदचे बटन दाबले की ते अक्रियाशील होतय. त्यामुळे त्यातलं रहस्य कोणालाच कळत नाही.
पेशवे : जरा जपून हं. जगात विद्वानांची कमी नाही बरं! नाही तर पुन्हा भीमा कोरेगाव करायचा.
फडणवीस : तुम्ही उगाच भीती दाखवू नका. त्याचा पुरता बंदोबस्त केला आहे आम्ही.
पेशवे : तो कसा काय?
फडणवीस : EVM चं रहस्य सांगणारा कुणी पुढे आलाच तर त्याला वाट्टेल तेवढे आमिष व सामिश दाखवून तोंड बंद करू. नोटबंदी केल्यामुळे आता आम्हाला काहीच कमी नाही.
पेशवे : पण बिचारा नरेंद्र यात नाहक बदनाम होत आहे; हे जर त्याला कळलं तर?
फडणवीस : तो काही करू शकणार नाही. कारण तो स्वत:च यात आकंठ बुडालेला आहे. तो ही ऐकत नसेल तर; महात्मा, दिनदयाल, इंदिरा, राजीव यांचे स्मरण करून देऊ त्याला….
पेशवे : पण बहुजनातील काही लोक आमिषाला बिलकुल बळी पडत नाहीत बरं.
फडणवीस : बरं ते जाऊ दे; तुम्हाला रोहीत, छगन, लालू ही नावं माहीत आहेत ना….?
पेशवे : पुढे भविष्यात काही योजना वगैरे….
फडणवीस : नाही. आम्ही असं काही भविष्यातील योजनेबद्दल कोणालाही सांगत नसतो.
पेशवे : अरे पण मी तुमचाच आहे ना…?
फडणवीस : तरी पण नाही.
पेशवे : अरे पण हे स्वप्न आहे….
फडणवीस : तरी नाही. आम्ही स्वप्नात देखील सांगत नसतो.
इतक्यात मांजरीन डबा पाडला आणि झोप मोडली व स्वप्न ही भंग झाले….
– डॉ. भीमराव गोटे
(कृपया योग्य वाटल्यास शेअर, फॉरवर्ड, कॉपी पेस्ट करा.)