नांदेड / विशेष प्रतिनिधी (एम.बि.टाळीकोटे) : जिल्ह्यातील १६ तालुक्यातील आठ महसुली विभागाअंतर्गत पोलीस पाटील भरतीचे एक हजार ७०० पदे मंजूर आहेत. त्यापैकी एक हजार पदे भरण्यास शासनाला अजूनही मुहूर्तच न सापडल्याने रिक्त असलेल्या गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न
ऐरणीवर आला आहे. त्यापैकी 700 भरती असलेल्या पोलीस पाटलांन पैकी 50 पदे निवृत्तीला आलेले आहेत त्यामुळे आता सर्व रिक्त पदे एकूण 1050 असे आहेत यामुळे एकेका पोलीस पाटलांना अतिरिक्त तीन तीन गावांचा पदभार सांभाळावा लागतो अशाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न
निर्माण होत आहे कारण ग्रामीण भागामध्ये पोलीस पाटील एक अशी दुवा आहे जी की यांच्या माध्यमातून गावातले भांडणे तंटे वाद-विवाद हे गावातच सोडवले जातात म्हणून ते भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी यासाठी मास संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना हे निवेदन देण्यात
आले अशाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांना अशा गोष्टींचा त्रास होणार नाही म्हणून शासनाने याचे गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावे यासाठी हे
निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित मास संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन दादा तलवारे, मासचे एडवोकेट बाबुराव वाघमारे ,कंधार तालुका अध्यक्ष संतोष भालेराव, मासचे कंधार तालुका सचिव ठाकूर बसवंते व आदीजण उपस्थित होते
