वलांडी / प्रतिनिधी : संजीवनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्स्वानिमित्त 15 ऑगस्ट रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून स्वातंत्र्याच्या चळवळीत ज्या महापुरुषांनी आपले सर्वस्व अर्पण करुन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या महापुरुषांचे स्मरण म्हणून त्यांच्या प्रतिमा संजिवनी चॕरिटेबल ट्रस्ट वलांडी तर्फै वलांडी येथील सर्व अंगणवाडी व ग्राम पंचायत कार्यालय येथे थोर महापुरुषांच्या प्रत्येकी दोन फोटो
संजीवनी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ.सुरेखा विलास वाघमारे, तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक श्री.रामराव सुर्यवंशी,
माजी सरपंच असदखा पठाण, अंगणवाडी सुपरवायजर सौ,गुरव मॅडम,श्री.अरुण भगवानराव पाटील, सौ सागरबाई नामदेव बनसोडे ग्रां प सदस्या, वैजनाथ गायकवाड, इस्माईल बौडीवाले, सामाजिक कार्यकर्ते वसंत बिबीनवरे, लारब शेख, रवींद्र बनसोडे, मा.विलास वाघमारे वलांडीकर (सचिव.संजिवनी चॕरिटेबल ट्रस्ट तथा देवणी तालुका रिपाई नेते ) यांच्या शुभ हस्ते प्रतिमा फोटो भेट देण्यात आल्या..या वेळी अनंत वाघमारे, अरुण बनसोडे, करन सोनवणे, अजमोद्दिन परीट, नजीर बौडीवाले, बालाजी पिटले, महेश मोदाळे, राहुल बनसोडे, प्रशांत हरगे, आदी ग्रामस्थांच्या उपस्थितीत थोर क्रांतिकारी महापुरुषाच्या प्रतिमा भेट देऊन अमृत महोत्सव उत्साहाने साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp