लातूर जिल्हा बँकेच्या सर्वच शाखेत सुविधा उपलब्ध

जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांचे आवाहन

लातूर :

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातील शेतकरी सभासदासाठी शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ करिता लागू करण्यात आली असून यावर्षीपासून शासनाने सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी शेतकऱ्यांना प्रती पिकास १ रुपयांत पीक विमा हप्ता भरावा लागणार त्यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यांतील सर्व शाखेत पीक विमा भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत पीक विमा भरावा असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी केले आहे

सदरील पीक विमा योजना ही एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत राबवण्यात येत असून जिल्ह्यातील आधीसुचीत महसूल मंडळामध्ये बाजरी, ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, व कापूस या ७ पिकासाठी लागू करण्यात आली आहे सदरील योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकय्रांना ऐश्चिक स्वरूपाची असून पिक विमा भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ आहे तसेच बिगर कर्जदार सभासदांना वीमा भरताना वीमा प्रस्तावासोबत ७/१२उतारा,८ अ, स्वयं घोषणा पत्र, आधारकार्ड, व बँक पासबुक ची छायाचित्र व इतर कागदपत्रे आवश्यक असून संबधित बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे

यासाठी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत पीक विमा भरावा असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख व्हॉईस चेअरमन अँड प्रमोद जाधव कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव सन्माननीय संचालक मंडळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp