@ दिव्यांगाना स्वतंत्र शिधापत्रिकेसह अंतोदय, योजनेत समाविष्ट करून शिधापत्रिका द्यावे,

@ ग्रामपंचायतील दिव्यांग राखीव ५%निधि तात्काळ देण्यात यावे

@श्रमिक क्रांती अभियांन संघटना
महाराष्ट्र राज्य यांच्याकडून जाहीर पाठिंबा जिल्हाध्यक्ष गजानन गायकवाड अजणीकर,

देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे

देवणी तालुक्यातील प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे वतीने १८/१०/२०२३ रोजी तहसील कार्यालयात दिव्यांगाना स्वतंत्र शिधापत्रिकेसह अंतोदय अन्य योजनेत समाविष्ट करून शिधापत्रिका देण्यात यावे यासाठी तहसील कार्यालयातील कर्मचारी चिल्ले यांना देण्यात आले तसेच पंचायत समिती कार्यालयात ग्रामपंचायतीत दिव्यांग राखीव ५℅निधी तात्काळ वाटप करावे यासाठी निवेदन अमोल कटृॆवार विस्तार अधिकारी, यांना देण्यात आले व अनेक वेळा आपल्याकार्यालयात निवेदन देऊन कोन्ही दखल घेतली नाही मा, गटविकास अधिकारी यांच्या पत्रात केराची टोपली दाखवली आहे म्हणून जर दिव्यांगाना राखीव पाच टक्के निधी लवकरात लवकर नाही दिल्यास देवणी तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव पंचायत समितीच्या समोर दि २७/१०/२०२३ रोजी तिव्र आंदोलन करण्यात येईल जर आंदोलन दरम्यान दिव्यांग बांधवांना काही बरे वाईट झाले तर सर्वस्वी जबाबदार गटविकास अधिकारी व प्रशासन राहिल यांची नोंद घ्यावी हि नम्र विनंती या निवेदनात सौ मनिषा पांचगे महिला देवणी तालुका तालुकाध्यक्ष, बालाजी सुर्यवंशी गुरनाळ, हंसराज गायकवाड, संगिता कलबुर्गे संजिव चव्हाण, सरस्वती गरड, कृष्णा साळुंके, प्रकाश डब्बे, प्रदिप धनुरे, विश्वनाथ घोपे,राजकुमार एनकुरे,मनोज कांबळे, पवण डब्बे,श्रीमंत कांबळे आदी सह उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp