देवणी : येथील विवेक वर्धनी वरिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. महादेव काशिनाथ मळभगे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून नुकतेच पीएचडी प्रदान करण्यात आले आहे. प्रा. मळभगे यांनी योगाचा १४ ते १६ वयोगटातील नवशिख्खा खो खो खेळाडूंचा शारीरिक व मानसिक क्षमतेवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास या विषयावर त्यांनी पीएचडी मिळविली आहे. त्यांना मार्गदर्शक डॉ. वैशाली माढेकर तर पर्यवेक्षक म्हणून डॉ. गोविंद मारतळे व चेअरमन डी.बी. पानसरे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सिद्धेश्वर सहकारी बँकेचे संचालक विजयकुमार मानकरी, संजय गांधी निराधार योजनेचे चेअरमन वैजनाथ लुल्ले, संस्थेचे सचिव भगवानराव पाटील तळेगावकर, देवणी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अमित मानकरी ,माजी सरपंच बाबुराव लांडगे,देविदास पतंगे, पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश कोतवाल, शहराध्यक्ष जावेद तांबोळी, नगरसेवक डॉ. अनिल इंगोले, नदीम मिर्झा, प्रवीण बेळ्ळे ,जमीर तांबोळी, योगेश ढगे , प्राचार्य रामरतन शिंदे ,उपप्राचार्य भालके एस व्ही, ओमप्रकाश पाटील, जयेश पाटील, विष्णू माळीचिमणे, सतीश सूर्यवंशी ,नरसिंग सूर्यवंशी, राम फावडे ,प्रमोद लासूणे, सुधाकर जाधव, बालाजी सोनकांबळे, माधव बिजापुरे, प्रभाकर माने ,उद्धव इंगोले, शंकर जिवणे,रोहित बंडगर, अमरदीप बोरे ,प्रशांत घोलपे, जाफर मोमीन, इस्माईल शेख गुरुजी आदिसह मित्र परिवाराने त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp