चाकूर / प्रतिनिधी : अलगरवाडी येथील रहिवासी तथा सिद्धेश्वर कनिष्ठ महाविद्यालय झरी बु येथील मराठीचे प्रा.वैजनाथ सरनर यांना त्यांच्या ” होलार
समाज परिवर्तनाची दिशा ” या वैचारिक ग्रंथाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन, व मातंग परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील
एका समारंभात जेष्ठ साहित्यिक तथा विचारवंत श्रीपाल सबनिस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले .
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.गजानन एकबोटे, प्रभारी कुलगुरू
डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार,मा.राजेश पांडे, मा. देविदास वायदंडे, डॉ.विजय रोडे , आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी
कुलगुरू डॉ.नितीन करमळकर हे होते.
यापूर्वी प्रा सुरनर यांना नेहरू युवा पुरस्कार, होलार समाज भुषण पुरस्कार , यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार , आंबेडकर
फेलोशिप ,भारतयात्रा पुरस्कार ,इ.पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आ.बाबासाहेब पाटील ,शिक्षक आमदार विक्रम काळे , जिल्हा अध्यक्ष मदन धुमाळ , जेष्ठ पत्रकार रामराव गवळी , प्रसिद्ध साहित्यिक विलास सिंदगीकर ,प्रा.डाॅ.राजकुमार मस्के,माजी
प्राचार्या रसिकाताई देशपांडे, कवी सतीश नाईकवाडे , कवी अंकुश सिंदगीकर ,प्रा.शिवाजीराव जवळगेकर ,प्रा दयानंद झांबरे , पत्रकार मधुकर कांबळे,
पत्रकार मारोती बुद्रूक ,प्रा.भिमराव साळवे ,कवी दत्ता जाधव यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
