प्रा.वैजनाथ सुरनर यांना..
महाराष्ट्र शासनाचा “डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार जाहीर “

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबईच्या वतीने दिन ,दलित, शोषित, समाजाच्या कल्याणासाठी कार्ये करनाऱ्या व्यक्तिस व संस्थेस दरवर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार दिले जातात मात्र २०२० ते २०२३ या कालावधीत पुरस्कार जाहीर झाले नव्हते २०१९-२०२० या वर्षातील “डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार ” चाकुर तालुक्यातील अलगरवाडी येथील रहिवासी असलेले व सध्या सिद्धेश्वर कनिष्ठ महाविद्यालय झरी बु येथे कार्यरत असलेले मराठीचे प्राध्यापक तथा साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे अभ्यासक,तथा फुले,शाहु, आंबेडकर चळवळीचे भाष्यकार, अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे मराठवाडा प्रमुख, साहित्यिक, विचारवंत प्रा.वैजनाथ सुरनर यांना जाहीर झाला आहे.
प्रा.सुरनर यांनी फुले,शाहु, आंबेडकर अण्णाभाऊं यांचे विचार जनमाणसात आणि होलार समाजात रुजविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक प्रबोधन केले आहे.ते फुले शाहु आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक व प्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित आहेत.परिवर्तन चळवळीत त्यांचे खुप मोठे योगदान आहे.त्यांनी खेड्यापाड्यातील बहुजन समाजाला महापुरुषांचे विचार पटवुन दिले आहे.अनुसुचित जाती, भटक्या विमुक्त जाती, इतर मागास जातींना केडरच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासनाच्या समितीवर तीन वर्षे उत्कृष्ट पणे कार्ये केले आहे.
त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन मा.मुख्यमंत्रीतथासामाजिक न्यायमंत्री, यांच्या अध्यक्षतेखालील समितीने साहित्यिक प्रा वैजनाथ सुरनर यांची निवड केली आहे.
सदरील पुरस्कार मुंबई येथे दि.१२ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वा.मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांच्या शुभहस्ते एका भव्य कार्यक्रमात दिला जानार आहे.
त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना यापुर्वी “नेहरु युवा पुरस्कार” , होलार समाज भुषण पुरस्कार, आंबेडकर फेलोशिप, आदर्श शिक्षक पुरस्कार, साहित्यरत्न ,लोकशाहीर, अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय वाड :मय पुरस्कार, राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळाले आहेत.
या निवडीबद्दल चंचल भारती विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री मा.बाळासाहेब जाधव,आ.बाबासाहेब पाटील,शिक्षक आमदार विक्रम काळे, संस्थेचे सचिव विक्रमसिंह दोडके पाटील, प्राचार्य गिरीधर कणसे, प्राचार्या रसिकाताई देशपांडे मॅडम, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ भाऊ माने,पहिले नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे ,पपण कांबळे,सरपंच सौ.सुरेखाताई सुरवसे , दयानंद भाऊ सुरवसे, अजित खंदारे,अॅड किरण जावीर, शिवाजीराव जावीर, प्राचार्य डॉ.राजकुमार मस्के,प्रा दयानंद झांबरे,प्रा.ज्ञानेश्वर चामे,प्रा.बाळासाहेब बचाटे,प्रा भिमराव साळवे,प्रा.मारोती बुद्रुक, पत्रकार मधुकर कांबळे, प्रशांत शेटे, सुधाकर हेमनर, संग्राम वाघमारे,सलीम तांबोळी,प्रा.अ.ना.शिंदे, विकास स्वामी,प्रा.शिवाजीराव देवनाळे,इ.नी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp