प्रेरक प्रेरिका यांचे ३८ महिन्याचे थकीत मानधन लवकरात लवकर काढून देणार — बच्चुभाऊ कडू
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी — देवणी शहरात धनुरे मंगल कार्यालय मध्ये प्रहार जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार व माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांना महाराष्ट्र राज्य साक्षर भारत संघटनेचे दहा जिल्ह्यातील प्रेरक प्रेरिका यांच्या वतीने थकित मानधन व नवीन योजनेत समाविष्ट व अंशकालीन यांना दर्जा देण्यात यावे व शासनाच्या विविध योजनेचे काम देण्यात यावे या मागणीसाठी लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अर्जुने भुजंग,संघटक लक्ष्मण रणदिवे, जळकोट तालुका रामदास कदम, निलंगा तालुका अध्यक्ष प्रकाश घोरपडे, चाकूर उद्धव दुवे, देवणी तालुका कृष्णा पिंजरे, उद्धव गायकवाड,यशवंत सोनकांबळे,छाया गायकवाड,शोभा बिरादार, महानंदा तादलापुरे, संगीता जीवने,अनिता सूर्यवंशी, कविता बिरादार,पंढरी जोळदापके, बीबीनंदा मानकरी, पद्मिनी गायकवाड, धनाजी आपटे, व्यंकट गायकवाड, परमेश्वर मामडे, उदगीर सतीश खरात,गोविंद जाधव, बालाजी वाघमारे, कदम,बाबुराव चांदेगावकर,सुधाकर कांबळे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत बच्चूभाऊ कडू साहेबांना देवणी तालुक्याच्या वतीने प्रेरक प्रेरिका यांच्या ३८ महिन्याचे थकित मानधन, नव साक्षरता अभियान चालू झाला आहे या योजनेत समाविष्ट करून घ्यावे व थकित मानधन देण्यात यावे, अंशकालीनचा दर्जा देण्यात यावे अनेक मागण्याची निवेदन बच्चूभाऊ कडू साहेबांना देण्यात आले यांनी या विषयावर मी प्रेरक प्रेरिका यांना न्याय देण्याचे काम मी करणार आहे आसे ते सांगितले आहे,