
फार्मरिच प्रोड्युसर कंपनी करडखेल व कृषी विभाग आत्मा यांच्या वतीने सोयाबीन बियाणे वाटप…
करडखेल येथे फार्मरिच प्रोड्युसर कंपनी, कृषी विभाग आत्मा यांच्या वतीने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) योजनेच्या वतीने मुल्यसाखळी विकास कार्यशाळा अंतर्गत,कंपनीचे कार्यक्षेत्रातील करडखेल,हेर,डिग्रस, लोहारा, गंगापूर ,जंगमवाडी व नरसिंगवाडी येथील अल्पभूधारक, शेतकऱ्यांना तसेच कोविडमधे वारलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीला सोयाबीन केडीएस ७२६ प्रमाणित बीयाणे मोफत वाटप करण्यात आले.खरीपपुर्व शेतकरी प्रशिक्षणात मा.राजेंद्र काळे, उपविभागीय कृषी अधिकारी उदगीर व संजय नाबादे, तालुका कृषी अधिकारी उदगीर, डॉ.सचिन शिंदे शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र लातूर व फार्मरिच प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन श्री रमेश चिल्ले यांचे हस्ते करण्यात आले.त्यावेळी उपसरपंच बाळु मुळे, कंपनीचे एमडी प्रणव चिल्ले, संचालक श्री गणेश सनगले, नागनाथ चिल्ले, तसेच कृषी अधिकारी राजेश मुळजे, कृषी पर्यवेक्षक सुनिल चव्हाण,कृस संजयसिंग चौहान, आत्माचे बीटीएम नितीन दुरुगकर, एटीएम अंधारे संदिप,फारुक शेख व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बीबीएफ व टोकण यंत्राणे पेरणी, बीजप्रक्रिया,जमीनीची निवड, मातीपरिक्षण, खतांचा संतुलित वापर, सेंद्रिय शेती, ड्रोनच्या साह्याने फवारणी याबाबत तज्ञानी सविस्तर मार्गदर्शन केले.